Bhimashankar Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, भीमाशंकर मंदिर पुढचे 3 महिने बंद राहणार; कारण काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नवीन वर्षापासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद राहणार आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये या मंदिरात अनेक विकास कामं केले जाणार आहेत.
ज्योतिर्लिंगांचे दर्शन करायला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत. या प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचं पुण्यात भीमाशंकर येथे एक ज्योतिर्लिंग आहे. हे भीमाशंकर मंदिर पुढचे तीन महिने भाविकांसाठी दर्शनासाठी बंद असणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक जात असतात. जर तुम्ही देखील येत्या नवीन वर्षाच्या निमित्त किंवा ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये फिरायचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
नवीन वर्षापासूनच म्हणजेच, 1 जानेवारी 2026 पासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद राहणार आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये या मंदिरात अनेक विकास कामं केले जाणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून कामाला सुरूवात होणार असून पुढच्या तीन महिन्यांपर्यंत हे काम चालणार आहेत. नवीन वर्ष सुरू होत असल्याने भीमाशंकर मंदिराचे विकास आराखड्यातुन नव्याने विकास कामे केले जाणार आहेत. भीमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम केले जाणार आहेत. मंदिराच्या सभा मंडपाचे काम करत असताना कोणत्याही भाविकाला इजा पोहोचू नये, यासाठी मुख्य दर्शनासाठी मंदिर तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.
advertisement
मंदिर प्रशासनाने भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात भाविकांना येण्यासाठी बंदी घातली आहे. पुढच्या आठ दिवसांमध्ये, प्रशासकीय पातळीवर पाहणी करून मंदिराच्या बांधकामाचं नियोजन केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील कामांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अनेक लोकांना ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त सुट्ट्या असणार आहेत. या दिवसांमध्ये अनेक भाविक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचा किंवा देव दर्शनाला जायचा प्लॅन करत असतात. जर तुम्ही सुद्धा भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शनासाठी जायच्या प्लॅनमध्ये असाल, तर 1 जानेवारी 2026 च्या आधीच जाऊन दर्शन करून या... त्याआधी गेलात तर तुम्हाला किमान दर्शन करण्यासाठी तरी मिळेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Bhimashankar Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, भीमाशंकर मंदिर पुढचे 3 महिने बंद राहणार; कारण काय?









