सोलापूर, दौंडवरून अजमेर दर्शन सुरूच राहणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, ‘या’ 4 गाड्या पुन्हा धावणार

Last Updated:

Central Railway: प्रवाशांची वाढती गर्दी आणि सण-उत्सवाचा काळ लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता 4 गाड्यांना मुदतवाढ देण्यात आलीये.

सोलापूर, दौंडवरून अजमेर दर्शन सुरूच राहणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, ‘या’ गाड्या पुन्हा धावणार
सोलापूर, दौंडवरून अजमेर दर्शन सुरूच राहणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, ‘या’ गाड्या पुन्हा धावणार
पुणे : प्रवाशांची वाढती गर्दी आणि सण-उत्सवाच्या काळात होणारी अतिरिक्त प्रवासाची गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून अनेक विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. साईनगर शिर्डी–बिकानेर, खडकी–हिसार, दौंड–अजमेर आणि सोलापूर–अजमेर या मार्गांवरील विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 04615 आणि 04716 साईनगर शिर्डी–बिकानेर–साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मार्गावर एकूण दहा अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या असून, शिर्डी दर्शनासाठी तसेच राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
advertisement
खडकी-हिसार साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक 04725 आणि 04726 हिसार–खडकी–हिसार साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेऱ्या 26 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. या मार्गावर एकूण आठ फेऱ्यांची वाढ करण्यात आली असून, उत्तर भारत आणि पुणे परिसरातील औद्योगिक व लष्करी भागाशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
अजमेर-दौंड गाडीला मुदतवाढ
गाडी क्रमांक 09625 आणि 09626 अजमेर–दौंड–अजमेर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण दहा फेऱ्या 30 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. दौंड हे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असल्याने मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील प्रवाशांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
advertisement
अजमेर-सोलापूर गाडी 29 जानेवारीपर्यंत
गाडी क्रमांक 09627 आणि 09628 अजमेर–सोलापूर–अजमेर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना 29 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या मार्गावर एकूण आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे धार्मिक, व्यावसायिक तसेच कौटुंबिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट आरक्षण, वेळापत्रक आणि थांब्यांची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळ किंवा नजीकच्या रेल्वे स्थानकावरून घेण्याचे आवाहन केले आहे. वाढीव फेऱ्यांमुळे गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
सोलापूर, दौंडवरून अजमेर दर्शन सुरूच राहणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, ‘या’ 4 गाड्या पुन्हा धावणार
Next Article
advertisement
Gold Investment: सोनं एवढं महाग तरी तुमच्या बजेटमध्ये कसं घ्यायचं? टेन्शन नाही वापरा ही ट्रिक
Gold Investment: सोनं एवढं महाग तरी तुमच्या बजेटमध्ये कसं घ्यायचं?
  • गोल्ड ETF द्वारे १००० रुपयांपासून सोन्यात डिजिटल गुंतवणूक करता येते, मेकिंग चार्ज लागत नाही

  • गोल्ड ETF मध्ये ९९.५% शुद्धतेची खात्री, चोरीची भीती नाही आणि त्वरित विक्री सहज शक्य आहे

  • डीमॅट अकाउंटद्वारे सोन्याचे युनिट्स खरेदी-विक्री करता येतात, गरज पडल्यास कर्जही मिळू शकते

View All
advertisement