Chinchwad Crime : नळ दुरुस्तीच्या बहाण्याने घरात शिरला, पण...; चिंचवडमध्ये प्लंबरचा धक्कादायक पराक्रम उघड
Last Updated:
Chinchwad Crime News : चिंचवडमध्ये नळ दुरुस्तीच्या बहाण्याने आलेल्या प्लंबरने सुपरवायझरचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर जे केलं ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावल,
चिंचवड : चिंचवड भागात घडलेली ही घटना सध्या चर्चेत आहे. पाइपलाइन दुरुस्तीच्या बहाण्याने आलेल्या एका प्लंबरने विश्वासघात करत सुपरवायझरची दुचाकी चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे दहा वाजता ही घटना चिंचवडमधील शाहूनगरमध्ये घडली. अनिल नारायण बोडके (वय 32) यांच्या घरात पाइप दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामासाठी राजेश बन्सल (वय 35) हा व्यक्ती प्लंबर म्हणून आला होता. काम चालू असताना त्याने अनिल बोडके यांना सांगितले की,''मला पाइप उघडण्यासाठी पाना आणायचा आहे, थोड्याच वेळात येतो.''
advertisement
अनिल यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला त्यांची दुचाकी दिली, जेणेकरून तो पटकन घेऊन येईल आणि काम सुरू ठेवेल. पण राजेश बन्सल परत आला नाही. काही वेळ वाट पाहूनही तो दिसला नाही, त्यामुळे अनिल यांना संशय आला. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही.
यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता समजले की, राजेश बन्सल हा खरा प्लंबर नसून तो पूर्वीही अशाच प्रकारे लोकांची फसवणूक करायचा. लोकांचा विश्वास संपादन करून तो त्यांच्याकडून वस्तू, पैसे किंवा वाहन घेऊन पळ काढायचा.
advertisement
चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. स्थानिकांकडून माहिती घेतली जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की आरोपीने दुचाकी विक्रीसाठी नेली असावी किंवा ती लपवून ठेवली असावी.
या घटनेमुळे शाहूनगर परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या बनावट कामगारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. काम देण्यापूर्वी व्यक्तीची ओळखपत्रे तपासावीत तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता घेऊन ठेवावा असेही सांगण्यात आले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 8:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Chinchwad Crime : नळ दुरुस्तीच्या बहाण्याने घरात शिरला, पण...; चिंचवडमध्ये प्लंबरचा धक्कादायक पराक्रम उघड


