महाराष्ट्रातील 1 कोटी 51 लाख महिलांची तपासणी, 'या' रोगाचा धोका वाढला, चिंताजनक अहवाल समोर

Last Updated:

Women Health: महाराष्ट्रात 1 कोटी 51 लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातून चिंताजनक अहवाल समोर आला असून धोका वाढला आहे.

महाराष्ट्रातील 1 कोटी 51 लाख महिलांची तपासणी, 'या' रोगाचा धोका वाढला, चिंताजनक अहवाल समोर
महाराष्ट्रातील 1 कोटी 51 लाख महिलांची तपासणी, 'या' रोगाचा धोका वाढला, चिंताजनक अहवाल समोर
पुणे : राज्यातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या तपासणी मोहिमेतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्वस्थ नारी, सशक्त परिवार या राज्यव्यापी आरोग्य मोहिमेत तब्बल एक कोटी 51 लाख महिलांची तपासणी करण्यात आली. त्यात हजारो महिला कर्करोगग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या मोहिमेचा उद्देश महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृती आणि लवकर निदानाद्वारे गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवणे हा होता.
चिंताजनक आकडेवारी
या व्यापक तपासणीदरम्यान 17 हजार 618 महिलांना मुख कर्करोगाचा संशय व्यक्त करण्यात आला, तर 450 महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक संशयित रुग्ण आढळले असून, राज्यातील आरोग्य स्थितीबाबत ही आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे.
advertisement
10 हजार महिलांना कर्करोग असल्याचा संशय
राज्यभरात 3 लाख 38 हजार 279 आरोग्य शिबिरांद्वारे ही तपासणी करण्यात आली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबतही गंभीर चित्र समोर आले आहे. या तपासणीत 54 लाख 47 हजार महिलांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 10 हजार महिलांमध्ये कर्करोगाचा संशय आढळला आणि त्यातील 243 महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग असल्याचे निश्चित झाले. नागपूर, बुलडाणा, पुणे, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांत हे प्रमाण अधिक आहे.
advertisement
नागपुरात सर्वाधिक कर्करोगग्रस्त महिला
मुख कर्करोगाच्या रुग्णांमध्ये नागपूर जिल्हा आघाडीवर असून तेथे तब्बल 3744 संशयित रुग्ण आढळले. त्यानंतर बुलडाणा ( 1269), अमरावती (1460 ) आणि नाशिक (565) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. राज्यभरातील 2349 बायोप्सी नमुन्यांपैकी 841 महिलांना मुख कर्करोग असल्याचे निश्चित झाले आहे.
दरम्यान, स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीत 82 लाख 51 हजार महिलांची तपासणी करण्यात आली. त्यात 12 हजार 286 संशयित रुग्णांपैकी 1470 महिलांची बायोप्सी करण्यात आली, ज्यातून 450 महिलांना कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. नाशिक (30), सातारा (28) आणि सांगली (29) जिल्ह्यांत स्तन कर्करोगाचे रुग्ण लक्षणीय प्रमाणात आढळले आहेत.
advertisement
आरोग्य विभागाने यानंतर महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून लवकर निदानाचे महत्त्व ओळखावे, तसेच कर्करोगविषयक जनजागृतीसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
महाराष्ट्रातील 1 कोटी 51 लाख महिलांची तपासणी, 'या' रोगाचा धोका वाढला, चिंताजनक अहवाल समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement