advertisement

Pune Traffic: पुणेकरांनो, लक्ष द्या! या रस्त्यावर 'नो एन्ट्री'; ईदनिमित्त वाहतुकीत मोठे फेरबदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Last Updated:

रमजान ईदनिमित्त चिंचवडगावात नमाज पठणासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.

वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
पिंपरी: रमजान ईदनिमित्त चिंचवडगावात नमाज पठणासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. चापेकर चौक येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. त्यामुळे, निगडी वाहतूक विभागाने २१ मार्च रोजी (चंद्रदर्शनानुसार बदल संभव) पहाटे ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत या भागातील वाहतूक पूर्णपणे वळवली आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत चापेकर चौक परिसरातील प्रमुख रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. केवळ रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच यातून सूट देण्यात आली आहे.
हे मार्ग राहतील बंद आणि असे असतील पर्यायी रस्ते:
१. मरीआई माता मंदिर ते चापेकर चौक: हा मार्ग बंद असून वाहनचालकांनी एसकेएफ कंपनीकडून अहिंसा चौकाचा वापर करावा किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलच्या मागील रस्त्याने प्रवास करावा.
advertisement
२. चापेकर चौक ते मरीआई माता मंदिर: या मार्गावर जाण्यासाठी आता जुना जकात नाकामार्गे सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल किंवा अहिंसा चौक या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
३. मोरयानगर ते चापेकर चौक: हा रस्ताही बंद ठेवण्यात आला असून, नागरिकांनी हनुमान मंदिर येथून सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्गाचा अवलंब करावा.
नमाज पठण शांततेत पार पडावे आणि शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी हे नियोजन केले आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: पुणेकरांनो, लक्ष द्या! या रस्त्यावर 'नो एन्ट्री'; ईदनिमित्त वाहतुकीत मोठे फेरबदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement