शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आता काँग्रेसची उडी; विधानसभा अध्यक्षांकडे केली मोठी मागणी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शिवसेना आमदार अपात्रता याचिकेसंदर्भात कँग्रेसनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
पुणे, 23 सप्टेंबर, वैभव सोनवणे : सध्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आता काँग्रेसनं देखील उडी घेतली आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे मोठी मागणी केली आहे.
शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे.
त्यामुळे संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेत दोन गट पडले. पक्षातील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जे आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
September 23, 2023 12:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आता काँग्रेसची उडी; विधानसभा अध्यक्षांकडे केली मोठी मागणी