भावाच्या हत्येसाठी 4 लाखांची सुपारी, तरुणीशी अनैतिक संबंध, पुण्यातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं

Last Updated:

कात्रजमधील गुजरवाडी परिसरात १७ नोव्हेंबर रोजी अजयकुमार गणेश पंडीत नावाच्या २२ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: काही दिवसांपूर्वी पुणे शहरात घडलेल्या अमानुष हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या कारणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. सख्या चुलत भावानेच चार लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात खुनाच्या घटनेचा पहिला साक्षीदारही सामील असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कात्रजमधील गुजरवाडी परिसरात १७ नोव्हेंबर रोजी अजयकुमार गणेश पंडीत (वय २२, रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याचा तीक्ष्ण शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता, अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत (वय ३५, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी अशोकला अटक करून कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, अजयचे आपल्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अशोकला मिळाली होती. याच संशयाच्या आणि रागाच्या भरात अशोकने अजयकुमारचा खून करण्याचा कट रचला आणि त्यासाठी सुपारी दिल्याचे सत्य समोर आले.
advertisement
पोलिसांच्या तपासात उघड झाले की, अशोकने अजयकुमारचा खून करण्यासाठी तिघांना चार लाख रुपयांची सुपारी दिली होती. यात कृष्णकुमार विजय महतो वर्मा (वय २१), सचिनकुमार शंकर पासवान (वय २६) आणि सर्वात धक्कादायक म्हणजे खुनाच्या घटनेतील पहिला साक्षीदार रणजितकुमार धनुखी यादव (वय ३०) यांचा समावेश होता.
रणजितकुमार यादव हाच खुनाचा पहिला साक्षीदार असूनही तो या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. हे चारही आरोपी पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वेने मूळ गावी झारखंडकडे पसार होण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
भावाच्या हत्येसाठी 4 लाखांची सुपारी, तरुणीशी अनैतिक संबंध, पुण्यातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं
Next Article
advertisement
Sanjay Raut: महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला...''
महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला
  • महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला

  • महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला

  • महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला

View All
advertisement