'..वॉर मी संपवणार', अजित पवार गटात फुटले फटाके, रुपाली ठोंबरेंचा थेट चाकणकरांना कडक इशारा

Last Updated:

'रुपाली पाटील ठोंबरे यांच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले तर चाकणकर यांच्यावर येणाऱ्या काळात गुन्हे दाखल झालेले दिसतील

News18
News18
पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटात नेमकं चाललंय का, असा सवाल उपस्थितीत झाला आहे. एकाच पक्षात असलेल्या  रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये आता आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगली आहे. रुपाली ठोंबरे यांनी थेट राजीनामा देण्याचं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. तसंच, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनेक गैर कामं केली आहे. आज त्यांनी माझ्या कुटुंबावर जर गुन्हे दाखल केले तर उद्या चाकणकरांवर गुन्हे दाखल होती, त्याामुळे महिला अध्यक्षपदाचा राजीनामा मागते.  चाकणकर आणि मी आता समोरासमोर लढणार आहे, अशी गर्जनाच ठोंबरे यांनी केली.
रुपाली चाकणकर या शुक्रवारी संध्याकाळी खडक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना माधवी खंडाळकर प्रकरणावर भाष्य केलं तसंच थेट रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.
'मी काल बीडमध्ये असताना माधवी खंडाळकर यांनी एक व्हिडिओ काढला होता तो डिलीट केला होता. माधवी खंडाळकर आणि तिचा बंधू माझी बहीण यांनी एकमेकांच्या समजते मी तक्रारी मागे घेतल्या होत्या.  बहिणीने त्यांचे सगळ्यांचे शूटिंग केलं होतं, तो काल विषय संपला होता. पण  आज अचानकपणे दुपारी ती महिला दुपारी येते परत गुन्हा दाखल करतात, त्यात माझं नाव आहे असं मला कळलं, स्वतःला अटक करून घ्यायला आले, मला कळू द्या तर कायद्याचा किती पोरखेळ चालवला आहे,
advertisement
एक व्यक्ती मारलेलं म्हणते, काय होतं.  माझ्यावर गुन्हा दाखल नाही. माझ्यावर गुन्हा दाखल करावा, माझ्या कुटुंबावर विनाकारण गुन्हा दाखल केला जात आहे. काल तक्रार घेतली नाही माझ्या फॅमिलीवर विनाकरण खोटे गुन्हे दाखल असेल तर आज त्यांनी ज्या प्रकरणी गुन्हा दाखल केला, तर माझाही गुन्हा दाखल करावा. रुपाली चाकणकर माधवी खंडाळकर यांचं प्रकरण पुढे आणलं आहे. तिथे विषय संपला होता. पण पदावर असताना गैरवापर चाकणकर यांनी केला आहे. गैरवापर करून गुन्हा दाखल केला जात आहे. म्हणून मी सांगते सत्तेवर असलेल्या लोक जर गुन्हे दाखल करत असेल तर मी कायद्याने तक्रार करेल, ती पोलिसांनी घेतली पाहिजे, असं ठोंबरेंनी ठणकावून सांगितलं.
advertisement
राज्य महिला आयोग अध्यक्षा चाकणकर या 2019 ला शहराध्यक्ष होत्या. त्यावेळी माधवी खंडाळकर, गौरी जाधव त्यांच्या सहकारी होत्या, त्या नेत्यांच्या सोबत काम करणाऱ्या सहकारी होत्या. ही महिलांना त्रास देत होत्या. खोटे व्हिडिओ करत होते. याचा नंतर खूप शिफारसी करताना दिसत आहे. पण रुपाली चाकणकर यांनी चांगली संधी दिली. पण असे व्हिडीओ तयार करणे, गुन्हे दाखल करणे हे काम याचे पुरावे माझ्याकडे आहे, असा इशाराच ठोंबरेंनी चाकणकरांना दिला.
advertisement
'रुपाली पाटील ठोंबरे यांच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले तर चाकणकर यांच्यावर येणाऱ्या काळात गुन्हे दाखल झालेले दिसतील, आयोगावर असताना अनेक चुकीची काम केले आहेत. चाकणकर यांनी सुरू केलेले वॉर रूपाली पाटील ठोंबरे संपवणार आहे' असंही ठोंबरे म्हणाल्या.
'चाकणकर आणि मी आता समोरासमोर लढणार'
'अजितदादा लक्ष देत असतात पण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर निर्णय घ्यावा.  राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा मागते. माझी विकेट काढायच्या असेल तर आता गाठ माझ्याशी आहे. माझ्या कुटुंबाशी असे कोणी काही करत असतील तर मी गप्प बसणार नाही. माझ्या दोन बहिणी आणि मावशीवर गुन्हे दाखल झाले आहे. माधवी खंडाळकर यांच्यासह दोन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चाकणकर आणि मी आता समोरासमोर लढणार आहे, अशी गर्जनाच ठोंबरेंनी केले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'..वॉर मी संपवणार', अजित पवार गटात फुटले फटाके, रुपाली ठोंबरेंचा थेट चाकणकरांना कडक इशारा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement