दुसऱ्या बाजीरावाने बांधलाय ‘हा’ ऐतिहासिक वाडा, 200 वर्षांनंतरही आहे भक्कम, Video

Last Updated:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि पेशव्यांची राजधानी असलेल्या पुणे शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.

+
News18

News18

पुणे, 8 जुलै : महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि पेशव्यांची राजधानी असलेल्या पुणे शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तू जुन्या काळातील आठवणी ताज्या करतात. पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंमध्ये 200 वर्ष जुन्या विश्रामबागवाड्याचा समावेश आहे. आजही चांगल्या अवस्थेमध्ये असलेल्या या वाड्याचा इतिहास फारसा कुणाला माहिती नाही.
का बांधला वाडा?
या वाड्याच्या जागेवर पेशवाईतील सरदार हरिपंत फडके यांची बाग होती.  या वाड्याला माळी विश्राम यांचं नाव देण्यात आलं. दुसऱ्या बाजीरावनं 1799 साली ही बाग खरेदी करू तिथं विश्रामबागवाडा बांधला. या वाड्याच्या बांधकामाची सुरवात जानेवारी 1800 मध्ये झाली आणि 1809 साली हs बांधकाम पूर्ण झाले. विश्रामबागवाडा हा मराठा साम्राज्याचा पेशवा दुसरा बाजीराव याचा जुन्या पुण्यातील राहता वाडा होता. शनिवार वाडा या पेशव्यांच्या वडिलार्जित वाड्यात राहण्यापेक्षा दुसऱ्या बाजीरावाने विश्रामबागवाड्यात राहणे पसंत केले.
advertisement
तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात इ.स. १८१८ साली पुण्याचा पाडाव होईपर्यंत ११ वर्षे दुसऱ्या बाजीरावाचे येथे वास्तव्य होते.मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे बाजीराव पेशवे सुमारे 11 वर्षे या वाड्यात राहत होते.
कशी आहे वाड्याची रचना?
पेशवेकालीन कागदपत्रातून या वाड्याची रचना कशा प्रकारची होती हे समजते.२० हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा वाडा तीन मजली असून, तो कोरीव लाकडासाठी प्रसिद्ध आहे. या वाड्याचे मुख्य शिल्पकार मनसाराम लक्ष्मण आणि दाजी सुतार होते. वास्तूकलेवर पेशवे शैलीचा प्रभाव दिसून येतो. हा वाडा प्रामुख्याने लाकडापासून बांधलेला असून, तो स्तंभ सजवलेला आहे. यातील प्रत्येक स्तंभ सागाच्या झाडापासून बनवलेला आहे. वाड्यामधे दगडी फरशी बसवण्यात आली असून, एक सागवानी गॅलरी आणि व्हरांडा आहे. त्यात टेराकोटा प्रकारातील नक्षीकाम आहे.
advertisement
पहिल्या मजल्यावर दरबार भरत असे. दरबार हॉललगतच एक लाकडी व्हरांडा आहे, तिथे संगीतकार आणि गायक कला सादर करायचे. सभागृह पर्यटकांसाठी खुले नाही, कारण ही वास्तू मोडकळीस आल्याने असुरक्षित मानली जाते. वाड्यात मस्तानी महाल आहे. त्यात एक मोठे नृत्य सभागृह आहे.  नगारखाना असेही या वाड्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याला मेघडंबरी असेही म्हटले जाते.
advertisement
विश्रामबागवाड्याची वास्तुशांती 20 नोव्हेंबर 1808 रोजी करण्यात आली. पेशवाईच्या अखेरीस दुसऱ्या बाजीरावांची पत्नी वाराणसीबाई या वाड्यात रहात असत.  या वाड्याच्या बंदोबस्तासाठी महिन्याला सुमारे चारशे रुपये खर्च पडत असे.
ब्रिटिशांच्या कालखंडात हा वाडा तब्बल एक लाख रुपयांना पुणे नगरपालिकेला विकल्याची नोंद आढळून येते. पुणे महापालिकेची सध्याची इमारत बांधून होण्यापूर्वी नगरपालिकेचे मुख्य कार्यालय विश्रामबागवाड्यामध्येच होते. 1818 साली इंग्रजांची सत्ता पुण्यावर आली. त्यानंतरची दोन वर्षे हा वाडा कुलपात बंद होता. पुढे 1821 साली इंग्रजांनी या वाड्यामध्ये संस्कृत पाठशाळा सुरु केली. पाठशाळेत अलंकार, न्याय, ज्योतिष, धर्म यासारखी शास्त्रे शिकवली जात.
advertisement
1879 काही समाजकंटकांनी या वाड्याला आग लावली. या आगीमध्ये वाड्याचे समोरचे दोन चौक जळून खाक झाले. नंतर स्थानिक नागरिकांनी वर्गणी गोळा करून त्या वाड्याची डागडुजी करून वाडा नगर पालिकेच्या ताब्यात दिला.
शहराच्या मध्य भागातील हा वाडा आणि त्याच्या दर्शनी भागातील मेघडंबरी ही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. सध्या या वाड्यात टपाल कार्यालय, महानगरपालिकेच्या काही कचेऱ्या आणि ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे. पेशवे काळातील वैभव म्हणून विश्रामबाग वाडा ही एकमेव निशाणी आज पुण्यात उभी आहे.
advertisement
पुणे महानगरपालिकेने विश्रामबाग वाडा या वास्तूला प्रथम श्रेणी (grade-1) वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.सध्या या ठिकाणी एक संग्रहालय, ग्रंथालय, पोस्ट ऑफिस आणि स्थानिक हस्तकलेचे दुकान आहे.
मराठी बातम्या/पुणे/
दुसऱ्या बाजीरावाने बांधलाय ‘हा’ ऐतिहासिक वाडा, 200 वर्षांनंतरही आहे भक्कम, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement