पुण्याजवळ आहेत बौद्धकालीन पाण्याच्या टाक्या, का करण्यात आली होती बांधणी? Video
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा प्राचीन वास्तूंनी समृद्ध आहे. येथे बौद्धकालीन पाण्याच्या टाक्या आहेत.
पुणे, 5 ऑगस्ट : पुणे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा प्राचीन वास्तूंनी समृद्ध आहे. येथील लेण्या तसेच गडकिल्ले हा ऐतिहासिक वारसा मावळला मिळालेला अनमोल ठेवी पैकी एक आहे. इतिहासामधल्या अनेक घटना तसेच अनेक गोष्टी आजही आपल्यापासून दडलेल्या आहेत. आज आपण ऐतिहासिक बौद्धकालीन पाण्याच्या टाक्या याविषयी जाणून घेणार आहोत.
बौध्द भिक्षूच्या पाण्याच्या सोयीसाठी टाक्यांची उभारणी
मावळ हा पूर्वीचा व्यापारी मार्ग होता. आताचा मावळ म्हणजे पूर्वीचा मामलेहार प्रदेश. हा एक समृद्ध आणि गजबजलेला व्यापारी मार्ग होता. लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहांमध्ये भिक्षु सन्यास, तपस्या, विश्रांतीसाठी करू लागला. लेणी ही प्रामुख्याने सातवाहन, राष्ट्रकुट या राजवंशाच्या काळात कोरल्या गेल्या. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये मावळातील कार्ले, भाजे, बेडसे, घोरावडेश्वर अशा परिचित लेण्या तर येलघोल, पाटण, भंडारा डोंगर, पाले, उकसान आणि इतर अपरिचित लेण्या आहेत.
advertisement
केळकर संग्रहालयामधील मस्तानी महाल पाहिला का? पाहा कोणी केला होता उभा Video
येथील मुख्य लेण्यांमध्ये चैत्यगृह, विहार, पोड्या (पाण्याची टाकी) शिल्पकला आणि मूर्तिकला आढळते. पुरातन काळात बौध्द भिक्षू हे धर्म प्रसारार्थ भारतभर फिरत असे. धर्मप्रसारासाठी त्यांची सहज आणि सोपी सोय व्हावी म्हणून लेण्या खोदल्या जात असे. कार्ले लेण्यापासून पूर्वेला टाकवे खुर्द गाव आहे आणि या गावाच्या अगदी वेशीजवळच या बौद्धकालीन पाण्याच्या टाक्या आढळून येतात .
advertisement
पुणे – मुंबई जुन्या महामार्गावर कामशेत ते मळवलीच्या दरम्यान टाकवे गावाच्या फाट्यापाशी जवळच काळ्या चिऱ्यामध्ये बांधलेलं देखणं श्रीकाळ भैरवनाथ मंदिर आहे. या मंदीराच्या नैऋत्येला सुबक खोदाईचे सुरेख मोट्ठे टाके साधारण 96000 लीटर क्षमतेचे आहे. बौध्द भिक्षू या ठिकाणावरून प्रवास करत पाण्याची सोयव्हावी या उद्देशाने ह्या टाक्या बांधल्या असल्याची माहिती इतिहास संशोधक सचिन शेडगे यांनी दिलीये .
advertisement
नक्षीदार टाके आढळून येते
टाक्यात उतरत जायला अर्ध-लंबगोलाकार खोदाई करून पायऱ्या खणलेल्या आहेत. टाक्याच्या आत किंचितनिमुळते होत जाणारे 2 खांब देखील आहेत. काळ्या दगडामध्ये खोदकाम करून हे नक्षीदार टाके आपल्याला आढळून येते. या टाक्याविषयी फारशी कल्पना आजूबाजूच्या लोकांना नाहीये. गावातील जुने जाणते लोक मात्र याविषयी माहिती सांगतात.
महाराष्ट्रातील 'हे' अख्खं गाव का आहे शाकाहारी? PHOTOS
टाक्याच्या डावीकडून तिसऱ्या मुखाच्या खोदाईच्या दर्शनी भागाच्या कातळ भिंतीवर अजून काही खोदलेली अक्षरे जाणवतात. शिलालेखाची अक्षरे झिजून क्षीण झालेली आहेत. टाक्यावरच्या लेखाचं वाचन झालं पाहिजे. टाक्याची खोदाई करण्यासाठी कोण्या व्यापाऱ्याने जे दान दिलं असेल, त्याची नोंद बहुदा शिलालेखात असेल. लेखाच्या वाचनाने कार्ले लेण्याशी आणि पुरातन व्यापारी मार्गाशी संबंध जुळू शकतो अशी माहिती ग्रामस्थांनी दिलीये .
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 05, 2023 6:28 PM IST