दाम्पत्याला मिळालं कष्टाचं फळ, आज 8 देशांमध्ये पोहोचतायेत उत्पादनं, फडतरे कुटुंबाच्या जिद्दीची गोष्ट!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
तात्यासाहेब आणि सरोजिनी फडतरे या दाम्पत्याने सुमारे 14 वर्षांपूर्वी भरडधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आणि इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ते तब्बल 8 देशांमध्ये 30 हून अधिक उत्पादने निर्यात करत आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : व्यवसाय करणे हे अनेकांचे स्वप्न असते, यासाठी अनेक जण आपली नोकरी सोडून व्यवसाय करतात आणि मेहनतीने त्यात यशही मिळवतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील इंदापूर तालुक्यातील तात्यासाहेब फडतरे व त्यांच्या पत्नी या आहेत. दोघांनी मिळून 2012 मध्ये मिलेट्सच्या व्यवसायाला सुरुवात केली. यामध्ये ज्वारी, बाजरी आणि नाचणीपासून बनवलेली इडली, चकली, शंकरपाळी, रवा, विविध पीठे आणि चिवडा, 30 हून अधिक पदार्थ बनवतात. त्यांनी फक्त 900 रुपयांपासून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. आज ते या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 15 ते 20 लाख रुपये नफा मिळवत आहेत. त्यांचे हे मिलेट्स जवळजवळ 8 देशामध्ये निर्यात केली जाते. आज जाणून घेऊयात, त्यांच्या व्यवसायाची यशस्वी कहाणी.
advertisement
तात्यासाहेब आणि सरोजिनी फडतरे या दाम्पत्याने सुमारे 14 वर्षांपूर्वी भरडधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आणि इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ते तब्बल 8 देशांमध्ये 30 हून अधिक उत्पादने निर्यात करत आहेत. तर अडीच कोटीपर्यंत वार्षिक उलाढाल करतात. त्यामुळेच त्यांचा हा अचंबित करणारा सगळा प्रवास आहे. फडतरे यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये जवळपास 12 वर्ष नोकरी केली. यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन मिलेट्सचा आपला व्यवसाय सुरू केला.
advertisement
2013 मध्ये नगर जिल्यातील देवळाली प्रवरा येथे ऑटोमॅटेड प्लांट सुरू केला.त्यामध्ये सगळे मिलेट्स ज्वारी, बाजरीपासून पोहा, इडली, चिवडा हे सगळे प्रॉडक्ट्स सुरू केले. याचा मुख्य उद्देश म्हणजे कमी खर्चात हे प्रॉडक्ट्स येतात आणि यामुळे शेतकऱ्यांचे हित जपले जात आहे आणि दुसरं म्हणजे फास्ट फूडमुळे अनेक आजार हे वाढतात. त्यामुळे आपण समाजाला काहीतरी चांगले देऊ शकतो. याविचारातून ते हा व्यवसाय करत आहेत. यामध्ये जवळपास आता 8 मिलेट्स आहेत. यातून ज्वारी, बाजरी, नाचणी या सगळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून रवा, इडली, डोसा हे तयार केले जातात. हे सगळे प्रॉडक्ट्स बाहेरच्या 8 देशामध्ये पाठवले जातात. हे प्रॉडक्ट्स महाराष्ट्रामध्येही लोकप्रिय आहेत.
advertisement
या देशात होते निर्यात -
अमेरिका, दुबई, नेदरलँड, बेल्जियम, कॅनडा, न्यूझिलंड, इंग्लंड, सिंगापूर आदी 8 देशात फडतरे यांची उत्पादने निर्यात होतात. अमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओमार्ट वेलनेस आदी ऑनलाइन माध्यमाद्वारे विक्री होते. www.gud2eat.in हे त्यांचे संकेतस्थळ आहे. त्यावरही विक्री केली जाते. पुण्यात 100, राज्यात 300, तर देशभरात 1 हजारांपेक्षा अधिक उत्पादनाची विक्री होत आहे.
advertisement
बहुतांश वेळा कच्चा मालाची खरेदी ही राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांकडून होते. प्रकल्प सुरू केला, त्यावेळी महिन्याला 3 क्विंटल धान्य लागत होते. मात्र, आता दर महिन्याला 10 टनपेक्षा अधिक धान्याची गरज भासते. त्यासाठी राज्यभरातील 10 शेतकरी उत्पादक कंपन्या व 300 पेक्षा अधिक शेतकऱ्यांसोबत नेटवर्क तयार केले आहे, अशी माहिती gud2eat कंपनीचे मालक तात्यासाहेब फडतरे यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 15, 2024 6:20 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
दाम्पत्याला मिळालं कष्टाचं फळ, आज 8 देशांमध्ये पोहोचतायेत उत्पादनं, फडतरे कुटुंबाच्या जिद्दीची गोष्ट!