Breakfast Spots Pune : सकाळची भूक भागवायची असेल आणि गरमागरम पोहे हवेत? पुण्यातली 'ही' लोकप्रिय ठिकाणे खास तुमच्यासाठी

Last Updated:

Breakfast Food Pune : पुण्यात नाश्त्याची खरी मजा घ्यायची असेल तर पोह्यांपेक्षा उत्तम काहीच नाही. सकाळी उठल्यावर गरमागरम पोहे, वर खोबऱ्याची पखरण, कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून खाल्ले तर दिवसाचा सुरुवातच स्वादिष्ट होते.

Steaming hot kanda poha topped with coconut and coriander – a true Pune breakfast delight.
Steaming hot kanda poha topped with coconut and coriander – a true Pune breakfast delight.
पुणे : सकाळच्या नाश्त्याचा विचार आला की महाराष्ट्रात पहिला क्रमांक पोह्यांचाच लागतो हे मात्र खरं. हलके-फुलके, पौष्टिक आणि चविष्ट असे पोहे प्रत्येक घराघरांत सकाळी नाश्तासाठी दिसून येतात. पिवळसर रंग, वरून कोथिंबीर, ओल्या खोबऱ्याची पखरण, शेंगदाण्यांची कुरकुरी आणि शेवची सजावट या सगळ्यामुळे पोहे खाण्याचा अनुभव नेहमीच खास ठरतो. पुणेकरांसाठी तर पोहे म्हणजे जिव्हाळ्याचा पदार्थ,म्हणूनच शहरात काही ठिकाणं अशी आहेत जिथे पोहे नक्कीच चाखायला हवेत.
उदयविहार – एस. पी. कॉलेजसमोर
टिळक रस्त्यावर असलेल्या उदयविहारचे पोहे आजही तेवढेच प्रसिद्ध आहेत. दुनियादारी चित्रपटातही या ठिकाणाचा उल्लेख आला आहे. इथल्या पोह्यांसोबत दिली जाणारी खास हिरवी चटणी हीच खरी ओळख. सकाळच्या वेळी इथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते.
उडुपी पोहे – शनिवारवाड्यासमोर
शनिवारवाड्यासमोरील उडुपी रेस्टॉरंटमध्ये सकाळी पोह्यांसाठी वेटिंग लागतं. भरपूर पोहे त्यावर सांबार आणि नारळाची चटणी घालून सर्व्ह केले जातात. पोह्यांचे पार्सल नेण्यासाठी अनेक खवय्ये खास हजेरी लावतात.
advertisement
आम्ही पोहेकर – पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ
नाव जसे तसंच पदार्थ. इथे तब्बल 16 प्रकारचे पोहे मिळतात. अवघ्या 20 रुपयांत पोटभर पोहे खाता येतात. फक्त पोहेच नाही तर पोहे वडे, पोहे कटलेटसुद्धा अप्रतिम लागतात. तर्री पोहे, दही पोहे, भेळ पोहे आणि कोकणी पोहे हे जरूर चाखावेत.
अमृततुल्य – नळस्टॉप
रात्री अडीचपासून सकाळी सातपर्यंत पोह्यांचा आनंद घ्यायचा असेल तर नळस्टॉपवरील हे ठिकाण परफेक्ट आहे. जरी इथे इतर पदार्थही मिळतात, तरीही ओळख मिळाली आहे ती गरमागरम, चविष्ट पोह्यांमुळेच. तरुणाईची इथे नेहमीच गर्दी असते.
advertisement
बिपीन स्नॅक्स सेंटर – गरवारे कॉलेजसमोर
इथली साबुदाणा खिचडी आणि शिरा प्रसिद्ध असले तरी पोहे अजूनही टॉप क्लास मानले जातात. मऊसूत, वाफाळलेले पोहे खाण्याचा आनंद खऱ्या पोह्यांच्या चाहत्यांना वेगळाच भासतो. पुण्यातील या खास ठिकाणी एकदा पोहे खाल्ले की ''सकाळ पोह्यांनीच उजाडते'' हे वाक्य अगदी खरं वाटतं
मराठी बातम्या/पुणे/
Breakfast Spots Pune : सकाळची भूक भागवायची असेल आणि गरमागरम पोहे हवेत? पुण्यातली 'ही' लोकप्रिय ठिकाणे खास तुमच्यासाठी
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement