पुण्याच्या 4 वर्षांच्या राधाचा विश्वविक्रम, बॅकवॉर्ड स्केटिंगमध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
राधा ही फक्त चार वर्षाची आहे.तिने आता पर्यंत अनेक मेडलं मिळवले आहेत.गेल्या 6 महिन्यात राधाने 9 सुवर्ण आणि 6 रौप्य अशी 15 पदके मिळालेली आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : अनेक लहान मुलांनी आपल्या नावावर वेगवेगळे विक्रम केलेले पाहायला मिळतात. त्यातच आता एका 4 चिमुकलीने विश्वविक्रम केला आहे. पुण्यातील राधा या चार वर्षाच्या चिमुकलीने बॅकवॉर्ड स्केटिंगमध्ये विश्व विक्रम केला आहे.
बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे 75 तास व 100 मीटर बॅकवॉर्ड स्केटिंग उपक्रम आयोजित केला होता. यामध्ये राधाने सहभागी होऊन ती रिले पूर्ण केली. तिच्या या कामगिरीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. वयाच्या साडेतीन वर्षापासून रोलर स्केटिंग शिकत आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची कशी नोंद झाली, हा विक्रम तिने कसा केला, याबाबत जाणून घेऊ.
advertisement
राधा ही फक्त चार वर्षाची आहे. तिने आतापर्यंत अनेक मेडल जिंकली आहेत. गेल्या 6 महिन्यात राधाने 9 सुवर्ण आणि 6 रौप्य अशी 15 पदके मिळालेली आहेत. तिचे कोच विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंग क्रीडा प्रकारात तिने विविध ठिकाणी यश प्राप्त केले आहे. राधाच्या या कामगिरीची गिनीज बुकात नोंद झाली आहे.
advertisement
सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूवर शेळ्या राखण्याची वेळ, सोलापुरातील धक्कादायक वास्तव
27-31 मे या कालावधीत हा उपक्रम राबविला होता. राधा ही रॉक ऑन व्हील या अकॅडमीत वयाच्या साडेतीन वर्षापासून रोलर स्केटिंग शिकत आहे. जिल्हा पातळीवर यशस्वी होत ती राज्य पातळीसाठी पात्र ठरलेली आहे. स्केटिंग क्रीडा प्रकारामध्ये राधाने देशाचे प्रतिनिधित्व करावे हीच इच्छा आहे, अशी भावना तिच्या पालकांनी व्यक्त केली.
advertisement
तिच्या या लहान वयात मोठ्या कामगिरीमध्ये तिच्या पालकांचे योगदान तर आहेच. पण तिचे कोच विजय मालजी यांचे योगदान सर्वात मोठे आहे. संपूर्ण भारतातून 350 मुलांमध्ये राधा सर्वात कमी वय असणारी मुलगी होती आणि ही बॅकवॉर्ड स्केटिंग स्पर्धा पूर्ण करत तिने आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले. तिने पुढे जाऊन ऑलम्पिकमध्ये जाऊन भारतासाठी गोल्ड मेडल आणावे, या शब्दात तिचे पालक सायली नगरकर आणि अभिषेक नगरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 27, 2024 5:42 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या 4 वर्षांच्या राधाचा विश्वविक्रम, बॅकवॉर्ड स्केटिंगमध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद