advertisement

फुकट अन् फायद्याचंही; भन्नाट पुणेकराच्या सुसाट कल्पनेतून सुरू झालं ग्लॅमरस वाचनालय!

Last Updated:

मराठी पुस्तकं वाचण्याची आवड असणाऱ्या सर्वांसाठी गुडन्यूज आहे.

+
News18

News18

पुणे, 21 ऑगस्ट : वाचनप्रेमी मंडळींचं शहर अशी पुण्याची ओळख आहे.  येथील अप्पा बळवंत चौक हा तर शालेय पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथील वेगगवेगळी ग्रंथालय देखील प्रसिद्ध आहेत. डिजिटल युगात येथील गर्दी कमी झाली अशी ओरड सुरू झालीय. पण, पुणेकरांनी आता पुन्हा एकदा वाचकांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसलीय.
पुण्यात आता वाचकांना मोफत पुस्तकं वाचवण्याचं एक प्रसन्न ठिकाण सुरू झालंय. 'भावर्थ पुस्तकालय' असं या दुकानाचं नाव आहे. कर्वे पुतळ्याजवळ असलेल्या या दुकानाला पुणेकरांनी वर्षभरातच डोक्यावर घेतलंय. सुमधूर संगीत, सुसज्ज बैठकव्यवस्था आणि इथले खास वैशिष्ट्य म्हणजे इथला प्रसन्न अँबियन्स यामुळे वाचनाची अविस्मरणीय अनुभूती घेण्यासाठी इथे सदैव वाचकांची रेलचेल असते.
advertisement
मराठी लोकांना एकत्र जोडण्याचा भावार्थ हा एक उपक्रम आहे. या ठिकाणी या आणि सर्व प्रकराची मराठी मराठी पुस्तकं वाचा. सध्या जवळपास 6 हजार पुस्तकं इथं आहेत. यामध्ये चरित्र, अध्यात्म,विज्ञान, इतिहास, आरोग्य, नाटक आणि कवितांचा समावेश आहे. त्याचबरोबर इथं बालसाहित्य देखील वाचता येतं. सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथं कुणालाही अगदी मोफत ही पुस्तकं वाचता येतात, अशी माहित 'भावार्थ' च्या व्यवस्थापक कीर्ती जोशी यांनी दिली.
advertisement
'पुस्तकांच्या दुकानात क्रॉसवर्डला ग्लॅमर आहे. मराठी पुस्तकांनाही तसंच ग्लॅमर देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. ज्यांना वाचनाची आवड आहे ते ग्रंथालयात जातात. पण, ज्यांना पुस्तकांची आवड निर्माण व्हायची आहे त्यांना मराठी वाचनकडे आणण्याचा  आमचा प्रयत्न आहे.
advertisement
'पाश्चिमात्य देशात जशी बुक कॅफे असतात तसाच मराठी पुस्तकांसाठी बुक कॅफेचा प्रयोग आम्ही सुरू केलाय. इथं भारतीय बैठकीचीही सोय आहे. त्याचबरोबर कॉफी मशिनही असून तिथं एक कॉईन टाकला की तुम्हाला कॉफीच्या आनंदासह पुस्तकं वाचता येतात, असं जोशी यांनी सांगितलं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
फुकट अन् फायद्याचंही; भन्नाट पुणेकराच्या सुसाट कल्पनेतून सुरू झालं ग्लॅमरस वाचनालय!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement