पोरी शाळेत निघाल्या, शेतकऱ्याच्या मुलाची कविता गेली सातासमुद्रापार, जपानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
बालपणापासून यमक जोडून काव्य रचत, शेतीत काम करत शेतकऱ्याच्या मुलाने कविता लिहिल्या आणि त्या कविता सातासमुद्रापार पोहोचल्या. तसेच अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित देखील करण्यात आल्या आहेत.
शिवानी धुमाळ,प्रतिनिधी
पुणे : कविता करणे हा अनेक जणांचा छंद असतो. तो छंद जोपासण्याचा प्रयत्न ही अनेकांकडून पूर्ण केला जातो. असाच छंद जोपासला आहे हिंगोलीच्या गणेश आघाव यांनी. बालपणापासून यमक जोडून काव्य रचत, शेतीत काम करत शेतकऱ्याच्या मुलाने कविता लिहिल्या आणि त्या कविता सातासमुद्रापार पोहोचल्या. तसेच अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित देखील करण्यात आल्या आहेत.
advertisement
कवितेचे 16 भाषांमध्ये अनुवाद
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी खुर्द या गावातील कवी गणेश प्रल्हादराव आघाव या कवीच्या शेकडो कविता प्रसिद्ध झाल्या असून विशेष म्हणजे या कविता सातासमुद्रापार पोहोचल्यात. गणेश याचा जन्म सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाला. सात ते आठ एकर जमिनीत त्यांच्या तीन भावंडांसह गणेश हे देखील शेती करतात. काही कारणास्तव त्यांचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शेतीत काम करत करत त्यांनी कविता रचायला सुरुवात केली. मुली शाळेत निघाल्या या त्यांच्या कवितेचे 16 भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
advertisement
जपानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कविता
मुलांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या बालभारती या मासिका त्यांच्या काही कवितांचा समावेश आहे. त्यांची हीच कविता जपानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये देखील अनुवादीत झाली. शेती करत करत त्यांनी चार कवितासंग्रह लिहिले. काळ्या मातीत विठ्ठल शोधावा आणि कविता हिरवी व्हावी असं म्हणत त्यांनी आपला लिहिण्याचा छंद सुरूच ठेवला. लहानपणापासून कवितेची आवड असून ती जोपासत मी माझे स्वप्न पूर्ण केले, असं गणेश सांगतात.
advertisement
सासू-सासऱ्याची अतूट इच्छा, 2 वेळा दहावीत अपयश, प्रबळ जिद्द मनाशी बाळगून 53 व्या वर्षी मिळवलं यश
view commentsशेतकरी, माय बापाची कविता, पोरी शाळेत निघाल्या यासह इतर कविता चीन, जपान, म्यानमार, श्रीलंका, ग्रीस इंग्लंड, अमेरिका आधी देशांसह तब्बल 21 देशांमध्ये पोहोचल्या आहेत. त्याच्या साहित्यिक योगदानाबाबत 2018 मध्ये त्यांना यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. शेती करत करत केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलाच्या कविता सातासमुद्रापार पोहोचणं हे नक्कीच सर्वांसाठी कौतुकास्पद आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 01, 2024 8:53 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पोरी शाळेत निघाल्या, शेतकऱ्याच्या मुलाची कविता गेली सातासमुद्रापार, जपानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश

