सासू-सासऱ्याची अतूट इच्छा, 2 वेळा दहावीत अपयश, प्रबळ जिद्द मनाशी बाळगून 53 व्या वर्षी मिळवलं यश

Last Updated:

मुंबईच्या सावित्री जगताप यांनी सासू सासऱ्याची अतूट इच्छा आणि प्रबळ जिद्द मनाशी बाळगून 53 व्या वर्षी परिस्तिथी बिकट असताना देखील दहावीची परीक्षा पास केली आहे. 

+
News18

News18

प्रियांका जगताप, प्रतिनिधी 
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत राज्यभरात अनेकानेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यातचं मुंबईच्या सावित्री जगताप यांनी सासू सासऱ्याची अतूट इच्छा आणि प्रबळ जिद्द मनाशी बाळगून 53 व्या वर्षी परिस्तिथी बिकट असताना देखील दहावीची परीक्षा पास केली आहे.
advertisement
कसं घेतलं शिक्षण? 
सावित्री भरत जगताप यांनी गगनगिरी महाराज या नाईट स्कूलमधून दहावीची परीक्षा दिली आणि त्यांना 68 टक्के गुण मिळाले. या यशाबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, माझ्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने माझ लग्न हे वयाच्या 16 व्या वर्षीच झाले. तेव्हा माझे शिक्षण 9 वी पर्यंतच झाले होते. लग्नानंतर माझ्या सासू- सासऱ्याची इच्छा होती की मी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करावे. पण कौंटुबिक सदस्य आणि मुलांची जिम्मेदारी खूप असल्यामुळे त्या वेळी मला माझे अपुरे शिक्षणं पूर्ण करता आले नाही. पण आज मी 30 वर्षानंतर माझी दहावीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
advertisement
हा प्रवास खडतर होता पण या प्रवासात माझा नवरा आणि माझे सर्व कुटुंब सतत माझ्या सोबत होते. ते नेहमीच मला प्रोत्साहित करायचे की तुम्ही अपुरे शिक्षण पूर्ण करा. माझी मुल ही मला अभ्यासासाठी शिकवण कशी घ्यायची हे सांगायचे. मी मधल्या काळामध्ये 2 वेळा दहावीसाठी प्रयत्न केला ही होता पण त्या प्रयत्नांना अपयश आले. त्यानंतर मी माझे प्रयत्न पुन्हा चालू ठेवल्याने या वेळेस शाळेतील शिक्षक सूद्धा खूप चांगले शिकवायचे व मासूम या शैक्षणिक ट्रस्ट कडूनही त्यांनी ही खूप सपोर्ट केला, असं सावित्री जगताप सांगतात.
advertisement
रोजच्या वेळेतून वेळ काढणे हे खूप वेळा काठीण जायचे. कारण मी ही स्वतः घर काम करून मुलांचे सर्व शालेय जबाबदारी बघून आणि घरातील सर्व काम झाल्यावर जेव्हा वेळ मिळत होता. तेव्हा मी गगनगिरी महाराज या नाईट स्कूल जॉईन करून माझे अभ्यासक्रम आणि पाठांतर करायची. सुरुवातीला वेळेचे गणित सोडण्यासाठी खूप त्रास ही व्हायचा. पण हळू हळू ताळमेळ जमून मी माझ्या जिद्दीने माझे अपुरे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण घेतं माझ्याही हेच लक्षात आले की शिक्षणाला कोणतीच वयोमर्यादा नसते. जसं सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा संदेश सर्व महिलांना दिला. तोच मी मनाशी बाळगून मी माझे हे अपुरे शिक्षण माझ्या सर्व कौटुंबिक परिवाराच्या समजुतीने आणि सतत देणाऱ्या प्रोत्साहाने आणि माझ्या प्रबळ जिद्दीने पूर्ण करू शकली आहे, असंही सावित्री जगताप सांगतात.
advertisement
कोणते विषात मिळाले किती गुण?
मराठी:- 77
हिंदी :- 72
इंग्रजी:- 52
गणितं:- 57
विज्ञान:- 60
इतिहास+भूगोल:- 74
500 पैकी 340 गुण प्राप्त झाले आहेत.
मराठी बातम्या/Viral/
सासू-सासऱ्याची अतूट इच्छा, 2 वेळा दहावीत अपयश, प्रबळ जिद्द मनाशी बाळगून 53 व्या वर्षी मिळवलं यश
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement