35 टक्केवाल्याचा नादच खुळा! मित्रांनी कापला केक अन् आजीनं दिली खास भेट, Video

Last Updated:

जालना येथील साईप्रसाद खेडकर हा दहावीत काठावर पास झाला आहे. त्याला सर्व विषयात 35 गुण मिळाले असून त्यानं निकालानंतर जल्लोष केला.

+
35

35 टक्केवाल्याचा नादच खुळा! मित्रांनी कापला केक अन् आजीनं दिली खास भेट, Video

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत अगदी शंभर टक्क्यांपर्यंत गुण घेतले आहेत. राज्यातील बहुतांश शाळांचा निकाल 100 टक्के एवढा लागला आहे. जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आहेच. मात्र काही विद्यार्थी अगदी काठावर पास होऊनही आनंदी असतात. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील साईप्रसाद रविंद्र खेडकर याला सर्वच विषयांत 35 गुण मिळाले आहेत. त्यामुळे 35 टक्के गुण मिळूनही त्याच्या कुटुंबीयांनी मुलगा पास झाल्याच्या आनंदात मोठा जल्लोष केलाय.
advertisement
सर्वच विषयांत मिळाले 35 गुण
साईप्रसाद वडीगोद्री येथील श्री. गुरुदेव विद्या मंदिर या शाळेत दहावीला होता. अभ्यासात थोडासा कच्चा असल्याने त्याला पास होण्याविषयी साशंकताच होती. मात्र काठावर का होईना पास झाल्याने त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना देखील मोठा आनंद झाला आहे. त्याच्या मित्राने तर चक चक्क शाल श्रीफळ देऊन व केक कापून त्याचा सत्कार केला आहे. तर त्याच्या मायाळू आजीने देखील त्याला मोबाईल भेट म्हणून दिलाय. साईप्रसादने मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र या सर्व विषयात प्रत्येकी 35 गुण मिळवले आहेत.
advertisement
पास झाल्याचा आनंद
"मी श्री गुरुदेव विद्यामंदिर या शाळेत इयत्ता दहावीला शिक्षण घेत होतो. परीक्षेनंतर मला पास होण्याची खात्री होती. जास्त गुण मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र निकाल पाहिल्यानंतर सगळ्याच विषयांमध्ये 35 गुण मिळाल्यानंतर मी देखील चकीत झालो. मात्र पास झाल्याचा आनंद देखील झाला. भविष्यात आयटीआय करून मला नोकरी करायची आहे," असं साईनाथ खेडकर याने सांगितलं.
advertisement
मुलाच्या यशावर खूश
साईनाथचे वडील रवींद्र खेडकर यांचा सलून व्यवसाय आहे. मुलाचा निकाल पाहिल्यानंतर पहिल्यांदा तर त्यांना आश्चर्यच वाटलं. कारण सगळ्याच विषयात 35 टक्के गुण मिळेल असं त्यांना वाटलंच नाही. मात्र तरीदेखील आम्ही खूश आहोत. काहीजण 90 टक्के गुण घेऊन देखील नाखुश असतात. आम्ही मात्र साईप्रसादच्या यशावर खुश असून तो जीवनात काहीतरी चांगलं करेल, अशी अपेक्षा त्याचे वडील रवींद्र खेडकर यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
35 टक्केवाल्याचा नादच खुळा! मित्रांनी कापला केक अन् आजीनं दिली खास भेट, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement