वडील लावतात फळांची गाडी, घरची परिस्थिती बेताची, क्लास न लावता दहावीत पोरीने मिळवले यश

Last Updated:

घरची परिस्थिती बेताचीच असताना अगदी क्लास न लावता फळविक्री करणाऱ्या वडिलांना आणि शिवणकाम करणाऱ्या आईला कामात मदत करत तिने हे यश संपादन केले आहे.

+
इकरा

इकरा बागवान 

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत राज्यभरात अनेकानेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तर काही जण परीक्षेत पास होण्यातच आनंद मानत आहेत. कोल्हापुरातील काही विद्यार्थ्यांनी देखील प्रतिकूल परिस्थितीतही दहावीचा उंबरठा चांगल्या पद्धतीने ओलांडला आहे. त्यातच कोल्हापूरची इकरा बागवान ही विद्यार्थिनी 89 टक्के मार्क मिळवत दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. घरची परिस्थिती बेताचीच असताना अगदी क्लास न लावता फळविक्री करणाऱ्या वडिलांना आणि शिवणकाम करणाऱ्या आईला कामात मदत करत तिने हे यश संपादन केले आहे.
advertisement
इकरा इर्शाद बागवान ही कोल्हापूरच्या दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग)कोल्हापूर संचलित नेहरू हायस्कूल शाळेत शिकत होती. तर तिचे वडील हे कोल्हापूरच्या राजाराम रोडवर फळांची गाडी लावतात. गेली कित्येक वर्षे या फळविक्रीच्या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. पण त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती बेताचीच राहिली. इकराला अजून दोन बहिणी आहेत. त्यात वडिलांना मिळणाऱ्या उत्पन्नातून घर चालवणे कठीण होऊन जाते. म्हणूनच हातभार लावण्यासाठी इकराची आई शिवणकाम करते. अशा परिस्थीतीत इकराने हे यश मिळवले असल्याने आई आणि वडील दोघांचाही आनंद गगनात मावेना झाला आहे.
advertisement
कसा केला अभ्यास?
क्लास न लावताच घरी अभ्यास करायचा असे इकराने घरची परिस्थिती बघूनच ठरवले होते. त्यामुळे योग्य नियोजन करुन ती अभ्यास करत असे. सकाळी लवकर उठून फॉर्म्युले पाठ करण्याची सवय तिने लावून घेतली होती. सकाळी अभ्यास करुन वेळ वाचविण्याच्या सवयीमुळे ती आई आणि वडिलांना मदत करण्यासाठी वेळ काढू शकत होती, असे इकराने सांगितले आहे.
advertisement
दोन्ही बहिणींचाही घेत असते अभ्यास
इकरा ही घरातली मोठी मुलगी आहे. तिच्यापेक्षा लहान बहीण ही आता नववीला असून सर्वात लहान बहीण चौथीला केली आहे. त्यामुळे घरातील बहिणींचा अभ्यासाची जबाबदारी देखील इकरा उचलत असते. स्वतःचा दहावीचा अभ्यास पूर्ण करून ती दोघा बहिणींचा अभ्यास पूर्ण करून घेत असे.
शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं, 60 व्यावर्षी परीक्षा देत आजीने मिळवले दहावीत यश Video
दरम्यान फळविक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नातून घर चालवणे अवघड होत असते. त्यातच तिघा मुलींचे शिक्षणासाठीही येणारा खर्च जमेल तसा भागवत असतो. पण तरीदेखील एक राणे कठीण परिस्थितीतही इतके चांगले मार्क मिळवल्याने तिची उच्च शिक्षणाची इच्छा पूर्ण करणार असल्याचे तिचे वडील इर्शाद बागवान यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
वडील लावतात फळांची गाडी, घरची परिस्थिती बेताची, क्लास न लावता दहावीत पोरीने मिळवले यश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement