Pune Ganeshotsav: प्रवाशांसाठी गुड न्यूज! पुण्यातून महाराठवाड्यासह कोल्हापूर, सोलापूरला जादा बस
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ganeshotsav 2025: पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून राज्यातून आणि परराज्यातून भाविक या काळात पुण्यात येतात. आता याच प्रवाशांसाठी जादा बस चालवण्यात येणार आहेत.
पुणे: पुण्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी राज्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक पुण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी विभागाकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या बस शनिवार, 30 ऑगस्टपासून धावणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून येथील गणपती देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या भाविकांना येण्या-जाण्याची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गर्दी आणि गरज लक्षात घेऊन मराठवाड्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीला जादा बस सोडण्यात येणार आहेत.
advertisement
शनिवारपासून धावणार जादा बस
पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी गौरी विसर्जनानंतर गर्दी वाढते. विशेषत: मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापुरातून अनेक भाविक पुण्याकडे येतात. याच पार्श्वभूमीवर स्वारगेट, शिवाजीनगर आणि इतर आगारांतून जादा बस सोडण्यात येणार आहेत. एसटी बसला विविध सवलतींमुळे प्रवासी संख्या मोठी असते. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.
गणेशोत्सव काळात लाखो भाविक पुण्यात येतात. त्यांच्या सोयीसाठी पुणे विभागातून विदर्भ, मराठवाड्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात जादा बस चालवण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 29, 2025 10:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Ganeshotsav: प्रवाशांसाठी गुड न्यूज! पुण्यातून महाराठवाड्यासह कोल्हापूर, सोलापूरला जादा बस


