advertisement

आधी भैय्या नंतर...! गौरीने 45 वर्षांच्या विवाहित पुरुषावर केला बलात्कार, FIR मध्ये त्याने संगळं सांगितलं!

Last Updated:

या प्रकरणी पीडित इसमाच्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर करण्यात आला गुन्हा दाखल केला आहे. 

News18
News18
अभिजित पोते, प्रतिनिधी
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका महिलेनं तरुणावर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, आता या महिलेची कुंडली आता समोर आली आहे. महिलेवर याआधी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. गौरीमयी (नाव बदललंय) असं आरोपी महिलेचं नाव आहे. या महिलेनं एका पुरुषावर अत्याचार केला.  गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या इसमावर अत्याचार केला होता, असा आरोपी पीडित इसमाने केला आहे. या प्रकरणी पीडित इसमाच्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर करण्यात आला गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
महिलेवर आधीही एक गुन्हा दाखल
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली अशी की, आपल्याकडे काल एक घटना घडली होती. या महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपी महिला आणि फिर्यादी इसमाची तुळजापूर देवी मंदिरात ओळख झाली.  ५ महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात ही घटना घडली होती. मार्च महिन्यात फिर्यादी आणि आरोपीचं  काही साथीदार हे तुळजापूरला फिरायला गेले होते. त्यानंतर काशी विश्वनाथ इथं गेले होते. ओळखीचा फायदा घेत काशी विश्वनाथ इथं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा माझा भाऊ आहे हे सांगत काही देवाण घेवाण झाल्याची पण माहिती आहे. या  महिलेवर एक अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती समोर आली आहे.  काल गुन्हा दाखल झाला असून आरोपीला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवलं आहे, अशी माहिती दिली.
advertisement
पीडित पुरुषाने FIR मध्ये काय म्हटलं? 
पीडित व्यक्ती हा ४७ वर्षांचा आहे. तो मुळचा कोल्हापूर इथं चंदगडमध्ये राहणार आहे. पीडित इसमाला दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. आरोपी गौरीमयी (नाव बदललंय) ही पुण्यात राहणारी आहे, तिची आणि माझी ओळख मी व माझे कुटुंब, सोबत 3 मित्र, त्याचे कुटुंब तुळजापूर येथे दि 07/11/2024 रोजी असे देवदर्शनासाठी गेलो होतो तेव्हा झाली आहे. त्यावेळी गौरीमयीने त्या ओळखीचा फायदा घेवून माझ्या पत्नीस कॉल करुन आमचे घरी येवून राहायला लागली. घरी आल्यानंतर तिने सांगितलं की, मी यापुढे मला भाऊ माणणार असून भावाचं नातं ठेवणार आहे. मी हायकोर्ट ला वकिलीची प्रॅक्टीस करत असून माझे खूप मोठमोठ्या ओळखी आहेत. त्या ओळखीने तुमचे जे काही काम असेल ते मी तुम्हाला भाऊ या नात्याने करून देईन.
advertisement
दुसऱ्या दिवशी तिला कलावती मंदिर बेळगाव इथं दर्शनासाठी जायचे असल्यानं मला विनंती केल्याने मी तिला दुचाकीवरुन घेऊन जात असताना त्यावेळी तिने सांगितलं की. यापुढे तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात तुमच्या अडचणीला मी नेहमी उभी राहीन. त्यावेळी ती माझ्या जवळीक करत असल्याने त्यावेळी मी तिला झटकण्याचा प्रयत्न केला. जाताना तिने मला घाणेरडे वाक्य ऐकवण्यास सुरुवात केल्यानं त्यावेळी मी तिला असे मला चालणार नाही. यापुढे तू आमच्या गावी येवू नको, असं खडसावलं.
advertisement
2000 रुपये दिले
त्यानंतर दर्शन झालेनंतर मी तिला पुण्याला जाण्यास सांगितलं, असता तिने माझी माफी मागून यापुढे, असं बोलणार नाही असं सांगून मला रिक्वेस्ट करून माझ्या दुचाकीवरुन पुन्हा आमचे राहते घरी आली. त्यादिवशी ती घरी आल्यानंतर मला आणि माझ्या पत्नीला विनंती करुन आमचे घरी दोन दिवस राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी कामावर गेलो असता त्यावेळी मला कॉलवरुन माझ्याकडे पैसे मागितले असता मी तिला नकार दिल्यानंतर माझा लहान भाऊ महेश कदम यांस विनंती करून ऑनलाईन 2000 रुपये घेतले.
advertisement
लॉजवर जवळ येण्याचा प्रयत्न
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला तिच्या घरी जायचे असल्यानं मला चंदगड स्टँडपर्यंत सोडण्यासाठी विनंती केल्याने तिला माझ्या दुचाकीवरुन बसवुन चंदगड स्टैंड ला गेलो असता त्याठिकाणी तिला वॉशरूम ला जायचे असलेने मी उघड्यावर वॉशरुमला जात नाही मला लॉजमधील रुममध्ये वॉशरूमला जायचं आहे, अशी विनंती केल्याने त्याठिकाणी असलेल्या एका लॉजवर मी तिला जाण्या सांगितलं. ती लॉजच्या रुममध्ये गेलेनंतर मला रुममध्ये येण्यास विनंती करून बोलावून मी खूप मोठी वकील आहे यापुढे मी तुमची साथ देईन, तुमच्या मुलाला मंत्रालयातील लोकांच्या ओळखीने नोकरीला लावेन, अशी आशा दाखवून माझा हात धरुन ओढण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी तिला नकार देत खाली येवून थांबलो, असता थोड्या वेळाने ती देखील खाली आली. त्यावेळी ती स्वत: बस स्टँडवर जावून पुण्याची बस धरून पुण्याला गेली.
advertisement
काशी विश्वनाथला जाण्याचा प्लॅन
त्यानंतर 13/02/2025 रोजी ते दिनांक 15/02/2025 रोजीपर्यंत आमच्या घरी थांबली. त्यांनतर ती पुण्याला गेलेनंतर तिथून माझ्या पत्नीला कॉल करुन सांगितलं की, आम्ही पुण्यातून माझी मैत्रीण स्वाती आणि तिची फॅमिली असे सर्वजण काशी विश्वनाथ दर्शनासाठी जाणार आहोत. मी तुमच्या पतीला भाऊ समजून सोबत घेवून जाणार आहे. कारण, सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळावा भरला आहे. विश्वनाथला माझ्या सोबत पाठवा त्यावेळी माझ्या पत्नीने मला देवदर्शन घेवून या असं सांगुन पुण्याला पाठवलं.
25/02/2025 रोजी काशी विश्वनाथला जायचं असल्याने मी पुण्यात स्वारगेटवर आलो. त्यावेळी बहीण या नात्याने एक मोबाईल दिला. सांगितलं की, तुम्ही एकटे राहु नका माझ्या घरी चला. मी गौरीमयीच्या कोथरुडमधील घरी राहण्यास गेलो त्यानंतर तिने माझा मोबाईल काढून घेतला. सांगितलं की. स्वातीची सासू वारले असून त्यांचे येणे कॅन्सल झाले आहे. त्यामुळे आपण दोघेच विमानाने जायचे आहे. आपल्या दोघांच्या विमानाचे तिकीट मी काढले आहे. असं सांगितलं आणि मला तिच्या बेडरुममध्ये झोपवलं.
गुंगीचं औषध देऊन अत्याचार
त्यावेळी मी झोपलो असताना तिने मला काहीतरी प्यायला देवून माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मी रागाच्या भरात तिथून निघून जात असताना माझा हात धरून माफी मागून जर येथून तू गेला तर तुला इथेच काहीतरी करीन, मी जे सांगेन त्याच पद्धतीने राहायचे. त्यानंतर 26/02/2025 रोजी काशी विश्वनाथला जायचे आहे, असे सांगून धमकी देवून जबरदस्तीने मला मुंबई एअरपोर्टवरुन काशी एयरपोर्टला नेले. त्यानंतर तिने मला धमकावलं की आता तू माझ्या कब्जात आहे जर काही कुरकुर केली तर तुला तुझ्या घरी जाऊन देणार नाही, तुझे कुटुंब उद्धवस्त करेन. मी घाबरून देवदर्शनासाठी होकार दिला.
३ दिवस काशी विश्वानाथमध्ये मुक्काम आणि रूम
त्यानंतर तिने मला देवदर्शनासाठी घेऊन तेथील पंडितांना माझ्या बाबतीत वाईट होणार आहे, असं सांगण्यास सांगितल्याने तेथील पंडितांनी मला शनी आहे, सोन्याची अंगठी घालावी लागेल, असं सांगितलं होतं. त्यानंतर तिने मला 3 दिवस जबरदस्तीने काशी विश्वनाथ ला ठेवून घेतले. मी वेगळी रूम करण्यास सांगितलं असता तू जर शहाणपण दाखवला तर तुला तुझ्या घरी जाणेस जागा ठेवणार नाही, असं धमकावलं.  मी ज्या रुममध्ये होतो त्या रुममध्ये येवऊन माझ्या सोबत शारीरिक संबंधाची मागणी करुन जवळीक करु लागली. त्यादरम्यान माझ्या पत्नीचा कॉल आल्यावर आम्ही सर्वजण आहोत, असं सांगण्यास भाग पाडलं.
२ लाख रुपये देण्याची धमकी
घाबरत घाबरत मी तिच्यासोबत पुण्याला आलो. पुण्यात आल्यानंतर जबरदस्तीने कल्याण ज्वेलर्स या ठिकाणी घेवून जावून एक सोन्याची अंगठी खरेदी करुन मला घालण्यास सांगितलं. जे काही झाले आहे ते कोणाला सांगितलं तर तुझी बदनामी करेन. तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मला आताच्या आता 2 लाख रुपये दे, नाहीतर तुझ्या विरोधात पोलीस स्टेशन इथं जावून खोटी केस करेन, असं धमकावलं.  त्यानंतर कसा बसा मी तिच्या तावडीतून सुटका करून बसने चंदगडला माझ्या गावी गेलो. माझ्या घरी गेल्यानंतर झालेला सर्व प्रकार माझ्या पत्नीला सांगितल्यानं. माझ्या पत्नीने तिला फोनवर झाडलं.
त्यानंतर गौरीमयीने काही दिवस फोन केला नाही. थोड्या दिवसांनी पुन्हा कोणत्या न कोणत्या नंबर वरून कॉल करुन मला 2 लाख रुपये दे नाहीतर माझ्याकडील फोटो व्हायरल करेल, मी खूप लोकांना असं फसवलं आहे. जर तूला या कचाट्यातून बाहेर पडायचे असल्यास आत्ताच्या आत्ता 2 लाख रुपये पाठव. अशी धमकी दिली. त्यानंतर गौरीमयीने ही कोल्हापुर येथे येवुन माझ्या पत्नीला फोन करून शिवीगाळ करुन सर्व खोटा प्रकार सांगून माझ्या सर्व वस्तू परत करण्यास सांगितल्यानं मी आणि माझी पत्नीने तिने दिलेल्या सर्व वस्तू कोल्हापूर येथे जावून परत करुन यापुढे कोणतेही संबंध न ठेवण्यास सांगितलं.
त्याचा राग मनात धरून गौरीमयी हीने माझ्या विरोधात खोटा तक्रारी अर्ज दिला आहे. अखेरीस या प्रकरणी फिर्यादीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आधी भैय्या नंतर...! गौरीने 45 वर्षांच्या विवाहित पुरुषावर केला बलात्कार, FIR मध्ये त्याने संगळं सांगितलं!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement