Gautami Patil: उचलायचं का? मंत्री चंद्रकांत पाटलांच्या व्हिडीओवर गौतमी पहिल्यांदाच बोलली, असं कुणी...
- Published by:Sachin S
Last Updated:
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटीलला उचलायचं का? असं पोलिसांना विचारताना व्हिडीओ व्हायरल झाला होता
पुणे : पुण्यात घडलेल्या रिक्षा अपघातामुळे नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर रिक्षाचालक कुटुंबाने गंभीर आरोप केले होते. पण, या पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता कारमध्ये गौतमी नव्हती, असं पोलीस तपासात उघड झालं. त्यानंतर गौतमीने पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली. यावेळी तिने भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या व्हायरल व्हिडीओवरही प्रतिक्रिया दिली.
पुण्यात रिक्षा अपघात प्रकरणामुळे गौतमी पाटीलने अखेर मौन सोडलं आहे. या प्रकरणावर तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने रिक्षाचालक कुटुंबाला मदत दिली होती, पण त्यांना नाकारली, असा दावाही केला. एवढंच नाहीतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटीलला उचलायचं का? असं पोलिसांना विचारताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर गौतमीने प्रतिक्रिया दिली.
advertisement
'आता असं कुणी बोललं असेल तर, प्रत्येकाला वाईट वाटणारच, आाता उचलायचं म्हणजे काय, मला फक्त एकच म्हणायचंय, चंद्रकांत पाटील दादा यांना काही म्हणायचं नाही. जो तो आपल्या परीने बोलत असतो. मला काही बोलायचं नाही. माझा संबंध काही येत नाही. गाडी माझी आहे हे मला मान्य आहे. पण, कोण म्हणत मी गाडीत आहे. मी गाडीत नव्हती. आता बघा म्हटलं तर पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तो ड्रायव्हर जिथे जिथे फिरला, तिथे पोलिसांनी तपासलं आहे, पण कुठेच मी दिसली नाही, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.
advertisement
मी खूप रडले
"बरं ठीक आहे, पण तुम्ही एखाद्याला इतकं का ट्रोल करताय. एवढं का बोलू शकता. एखाद्याला किती ट्रोल करतात. या प्रकरणामुळे मी खूप रडले, मला खूप त्रास झाला. किती एखाद्याला त्रास देताय. मी पहिल्यापासून ट्रोल झाली आहे. ठीक आहे ना, पण असं नाहीये ना, माझ्याकडे पण पाहा ना. मी गाडीतच नव्हती तर मला का दोष देताय' असा सवालही तिने उपस्थितीत केला.
advertisement
रिक्षाचालक मरगळे कुटुंबानेच मदत नाकारली'
'मी कारमध्ये नव्हती, त्यावेळी घडलेल्या घटनेशी माझा संबंध काहीच नव्हता. घटना घडल्यानंतर मी मदतही पाठवली होती. माझा एक मानलेला भाऊ आहे, त्याला मी मदत घेऊन पाठवलं होतं. मी सुद्धा गरिबीतून आली आहे, मला त्या गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे जी मदत करता येईल ती केली. पण समोरून मला नकार आला. त्यांनी मदत घेण्यास नकार दिला, जे काही कायदेशीर आहे, त्यानुसार मदत घेऊ अशी त्यांची भूमिका होती. अपघात हा ५ वाजता झाला होता, त्यानंतर दुपारी मदत पोहोचवली होती. मरगळे कुटुंबीयांनी कायदेशीर चालायचं अशी भूमिका घेतली होती. मग ठीक आहे, मग मी शांत बसले. नंतर त्यांना मला ट्रोल केलं. कुणीही काही बोलतं. काहीच अर्थ नाही. त्यांनी माझं नाव बदनाम केलं आहे. जिथे माझा संबंध नाही, तिथे माझं नाव जोडलं. मग कायदेशीर चाललं ते चालू द्या, मग मला असं म्हणायचं आहे, असंही गौतमीने स्पष्ट केलं.
advertisement
जखमी रिक्षाचालकाला का भेटायला गेली नाही?
'माझ्या तारखा आधीच घेतलेल्या असतात. त्या मी रद्द करू शकत नाही. समोरून अडव्हान्स पैसे घेतलेले असतात. समोरून लोकांचा खूप खर्च झालेला असतो, त्यामुळे मी रद्द करू शकत नाही. तरी जरी मी वेळ काढला. माझी भाऊ लोक तिथे मदत द्यायला पोहोचले होते. पण त्यांचा छान छान रिप्लाय येत होता. ते काय काय बोलले हे सगळ्यांसमोर आलं आहे. आता असा रिप्लाय आल्यावर मग मी कसं गेलं पाहिजे. मग तिथे जाऊन काय उपयोग झाला असता. ४ दिवस झाले, मला ट्रोल करण्यात आलं. मला ट्रोलिंग काही नवीन नाही. मी जशी व्हायरल झाली, तसं मला ट्रोल केलं जातंय, कोण मला चांगलं म्हणत नाही. मी चांगलं केलं तरी लोक मला वाईट म्हणतात. अन् जर काही वाईट केलं तर ते आहेच, त्याचा बोभाट आहेच. मला काय म्हणायचा, माझा संबंध येत नाही, मग माझं नाव तुम्ही का घेतात. अपघात हे दररोज होतात. आता हे व्हायला नको हवं होतं, माझ्यासाठीही शॉकिंग आहे. एवढं सगळं होतं, मग त्यावेळी का नाही, असा सवालही तिने उपस्थितीत केला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 07, 2025 6:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Gautami Patil: उचलायचं का? मंत्री चंद्रकांत पाटलांच्या व्हिडीओवर गौतमी पहिल्यांदाच बोलली, असं कुणी...