रिल्सच्या नादात भरकटली तरुणाई! पुण्यातल्या तरुणीचा जीवघेणा स्टंट, पाहूनच येईल अंगावर काटा

Last Updated:

पुण्यातील तरुणीने रील्स बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट केल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यातल्या तरुणीचा जीवघेणा स्टंट
पुण्यातल्या तरुणीचा जीवघेणा स्टंट
पुणे (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : तरुणांमध्ये सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रिल्स बनवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजकालचे तरुण-तरुणी रील्सच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही मागेपुढे पाहात नाहीत. अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या. आता पुन्हा एकदा पुण्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. यात पुण्यातील तरुणीने रील्स बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट केल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही तरुणी स्टंट करताना दिसली. ही तरुणी या उंच वास्तूवरून खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या एका तरुणाने तिचा हात पकडला आहे. चुकूनही तिचा हात सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
advertisement
घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. या स्टंटचं चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरामनसुद्धा त्या ठिकाणी उपस्थितीत असल्याचं पाहायला मिळतं. तो वरती थांबला असून तरुणीच्या या भयंकर स्टंटचा व्हिडिओ काढत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे समजू शकलेलं नाही. मात्र, तो आता व्हायरल झाला आहे. अशात पोलिसांकडून या प्रकरणी कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
छ. संभाजीनगरमध्ये दुर्घटना -
नुकतंच छत्रपती संभाजीनगरमधूनही एक घटना समोर आली होती. यात एका २३ वर्षीय तरुणीला रिल बनवणं जीवावर बेतलं. गाडी चालवतानाची रील ती बनवत होती. यावेळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ हा भयानक अपघात घडला. यावेळी कार दरीत कोसळून २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. श्वेता दीपक सुरवसे असं या तरुणीचं नाव आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
रिल्सच्या नादात भरकटली तरुणाई! पुण्यातल्या तरुणीचा जीवघेणा स्टंट, पाहूनच येईल अंगावर काटा
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement