जिथं कालपर्यंत काहीच नव्हतं तिथं अचानक दिसू लागले चमकते खांब, पोलीसही शॉक; रहस्य काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
हे धातूचे मोनोलिथ वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. अनेकांनी त्याचा संबंध एलियनशी जोडला.
नवी दिल्ली : जगात अशा बर्याच गोष्टी आहेत ज्यांचं रहस्य अद्याप उलगडलं नाही. अशीच एक गोष्ट म्हणजे चमकते खांब. 2020 मध्ये जेव्हा जग महासाथीशी झुंज देत होतं, तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये चमकदार धातूचे खांब दिसू लागले. आता पुन्हा असे खांब दिसू लागले. कालपर्यंत जिथं काहीच नव्हतं तिथं अचानक असे खांब दिसू लागल्याने पोलीसही शॉक झाले आहेत.
या चमकदार खांबाला मोनोलिथ असं म्हटलं गेलं. नुकताच अमेरिकेच्या लास वेगास शहरापासून सुमारे एक तासाच्या अंतरावर नेवाडा वाळवंटात हा मोनोलिथ सापडला. जेव्हा लास वेगास पोलिस विभागाने ते पाहिले आणि तपास केला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि ट्विटरवर त्याचे फोटो केले.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी पोस्टमध्ये म्हटलं, रहस्यमय मोनोलिथ, आम्ही बऱ्याच विचित्र गोष्टी पाहतो. जसं की, जेव्हा लोक हवामानाविषयी माहिती न घेता गिर्यारोहण करतात आणि त्यांच्याबरोबर पुरेसे पाणी आणत नाहीत. पण हे त्याहूनही विचित्र आहे, मी असं कधीच पाहिलं नाही. तुम्हीही ते पहा.
advertisement

अनेक ठिकाणी असे खांब
असे मोनोलिथ याआधीही पाहण्यात आले आहेत. 40 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या उटाह वाळवंटातही मोनोलिथ दिसत होता. त्याचप्रमाणे, रोमानियामध्ये एक मोनोलिथ दिसला होता, त्याशिवाय तो कॅलिफोर्निया, आयल ऑफ विट या इंग्रजी चॅनेलमध्ये दिसला होता आणि या वर्षी मार्चमध्ये, वेल्समधील डोंगरावरही हा मोनोलिथ दिसला होता.
advertisement
याचं रहस्य काय?
त्यांना ठेवण्याचे काम कोण करत आहे, कोणत्या कारणासाठी त्यांना ठेवलं जात आहे, याबाबत सध्या कोणाकडेही माहिती नाही. प्राचीन काळी हे दगडाचे खांब असायचे. पण 4 वर्षांपूर्वी जेव्हा हे धातूचे मोनोलिथ वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. अनेकांनी त्याचा संबंध एलियनशी जोडला. ते म्हणाले की हे एलियन जगाचे प्रवेशद्वार असू शकतं. तर केवळ कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हे केलं जात असल्याचंही अनेकांचे मत आहे.
Location :
Delhi
First Published :
June 20, 2024 11:07 AM IST
मराठी बातम्या/Viral/
जिथं कालपर्यंत काहीच नव्हतं तिथं अचानक दिसू लागले चमकते खांब, पोलीसही शॉक; रहस्य काय?