Exhibition : 100 वर्षांपूर्वीची लिथो पेंटिंग्ज अन् जुने कॅमेरे, पुण्यात दुर्मिळ वस्तूंचे भव्य प्रदर्शन, Video

Last Updated:

हे प्रदर्शन केवळ छंद जोपासण्यापुरते मर्यादित नसून, मानवी संस्कृती आणि इतिहासाचे संवर्धन करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. माणसाच्या जीवनातील विविध छंद हे त्याचे जीवन समृद्ध करतात आणि अशा दुर्मिळ वस्तूंच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जपला जातो.

+
News18

News18

पुणे : इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटेम्स या संस्थेतर्फे बालगंधर्व कलादालनात दुर्मिळ वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन केवळ छंद जोपासण्यापुरते मर्यादित नसून, मानवी संस्कृती आणि इतिहासाचे संवर्धन करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. माणसाच्या जीवनातील विविध छंद हे त्याचे जीवन समृद्ध करतात आणि अशा दुर्मिळ वस्तूंच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जपला जातो.
या 30 व्या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश असून, त्यामागील छंदिष्ट व्यक्तींच्या गोष्टींनाही सादर करण्यात आले आहे. येथे मांडण्यात आलेल्या वस्तूंमध्ये माऊथ ऑर्गन, चांदीची घड्याळे, जुने कॅमेरे, खनिजे, पेंटिंग्ज, ऐतिहासिक पत्रव्यवहार, जुन्या दिनदर्शिका, तसेच 100 वर्षांपूर्वीची रामायणावरील लिथो पेंटिंग्ज यांचा समावेश आहे.
advertisement
प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरले आहेत 100 वर्षांहून अधिक जुन्या रेडिओचे नमुने, जे गरम केल्यावर सुरू होत असत आणि त्यांना आकाशात अँटेना लावावी लागत असे. आज नामशेष झालेल्या या वस्तू अजूनही कार्यरत स्थितीत पाहायला मिळताततसेच विविध देशांतील (जसे की जर्मनी, जपान, इंग्लंड) हार्मोनियम्सचा एक समृद्ध संग्रहही येथे आहे.
advertisement
या प्रदर्शनामध्ये 16 दुर्मिळ वस्तू संग्राहक सहभागी झाले असून, त्यांनी आपल्या खास संग्रहातील वस्तू सार्वजनिक दर्शनासाठी ठेवल्या आहेत. जगातील विविध प्रकारचे 100 हून अधिक जुने कॅमेरे, हिटलरच्या काळातील वर्तमानपत्रे, ऐतिहासिक पत्रे आणि इतर वस्तू इथे पाहता येतात ज्या इतरत्र कुठेही सहजपणे पाहायला मिळत नाहीत.
advertisement
या प्रदर्शनाचा उद्देश नागरिकांना या ऐतिहासिक आणि दुर्मिळ वस्तूंबाबत माहिती देणे आणि त्या पाहण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे संयुक्त सचिव श्याम मोटे यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Exhibition : 100 वर्षांपूर्वीची लिथो पेंटिंग्ज अन् जुने कॅमेरे, पुण्यात दुर्मिळ वस्तूंचे भव्य प्रदर्शन, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement