advertisement

Weather Alert : राज्यात उष्णतेची लाट, विदर्भावर पुन्हा दुहेरी संकट, पाहा हवामान अंदाज

Last Updated:

17 एप्रिल रोजी राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. 

+
News18

News18

पुणे : एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यातील तापमानात सतत वाढ होताना दिसून येत आहे. सध्या राज्यातील विविध भागातील तापमान हे 34 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. 17 एप्रिल रोजी राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या सर्व ठिकाणी 17 एप्रिलला उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण विदर्भात 17 एप्रिलला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 17 एप्रिलला मुंबई मध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 17 एप्रिलला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून त्याठिकाणी सुद्धा उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होऊ शकते.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात वाढ होऊन तेथील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. नाशिकमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी 17 एप्रिलला मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.
advertisement
नागपूरमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 17 एप्रिलला त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असू शकते. वाढते तापमान आणि पावसामुळे राज्यात दमट वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे परिधान करणे आणि उष्माघातापासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Weather Alert : राज्यात उष्णतेची लाट, विदर्भावर पुन्हा दुहेरी संकट, पाहा हवामान अंदाज
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement