गणपतीची अनोखी मूर्ती, मातीने भाजून केली जाते तयार, लोकांचा प्रचंड प्रतिसाद, पण पुण्यात कुठे मिळते?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराजवळ हे दुकान असून ते गेली 13 वर्ष झालं हे बनवण्याच काम करतात. हे पूर्णपणे हाताने तयार केले जातात.अतिशय सुंदर सुबक अशा या मूर्ती आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : सर्वांचे श्रद्धा आणि प्रेरणास्थान असलेल्या असलेल गणपतीच्या वेगवेळ्या मूर्ती आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे असणारा टेराकोटा गणपती हा पूर्ण पणे इकोफ्रेंडली पद्धतीने बनवला जातो. म्हणजेच मातीला भाजून हा गणपती बनवतात. ही मूर्ती अतिशय आकर्षक व वेगळी अशी आहे. गणपतीची ही मूर्ती 100 रुपयांपासून मिळते.
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराजवळ हे दुकान आहे. मागील 13 वर्षांपासून मूर्ती बनवण्याचे काम ते करत आहेत. हे पूर्णपणे हाताने तयार केले जातात. अतिशय सुंदर सुबक अशा या मूर्ती आहेत. हाताने बनवले जात असल्याने या मूर्ती तयार करायला बराच कालावधी लागतो. त्यामुळे याची किंमत थोडी जास्त असून 100 रुपयांना विक्री केली जाते.
advertisement
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आलेले भाविक इथून खरेदी करताना पाहायला मिळतात. दिसायला सुंदर अशा या मूर्ती आहे. त्यामुळे गणपतीची ही मूर्ती आपण घरात ठेऊ शकतो. तसेच ती भेट म्हणूनही आपण देऊ शकतो. त्यामुळेच असे वेगळे गणपती घ्यायचे असतील तर तुम्ही याठिकाणी येऊ शकतात.
advertisement
आधुनिक यांत्रिकीकरणाचा फटका, केरसुणीचा पारंपारिक व्यवसाय डबघाईस, सोलापुरात नेमकी काय परिस्थिती?
मागील 13 वर्षांपासून गणपतीची मूर्ती तयार करुन विक्री केली जात आहे. हे इको फ्रेंडली गणपती असून मातीला भाजून केल जातात. सर्व प्रथम माती मळावी लागते. 100 नंबर स्क्रीनवर गाळून घ्यावी लागते. ते सेट करून कच्च्या मातीमध्ये तयार केल जाते. त्यानंतर ते भाजून तयार होते. त्याला कलर करून ती मूर्ती पूर्ण करून विक्रीसाठी आणली जाते. ही बनवण्यासाठी बराच कालावधी लागतो, अशी माहिती मूर्ती विक्रेते अनिल मौर्य यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 27, 2024 2:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
गणपतीची अनोखी मूर्ती, मातीने भाजून केली जाते तयार, लोकांचा प्रचंड प्रतिसाद, पण पुण्यात कुठे मिळते?