Indapur Election : इंदापूरमध्ये राजकीय भूकंप! विश्वासू सहकाऱ्यानेच दिलं अजित पवारांना आव्हान

Last Updated:

Indapur Election : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार वांना आव्हान दिले आहे.

Indapur Election Pradeep Garatkar
Indapur Election Pradeep Garatkar
Indapur local body Election : गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूर नगराध्यक्षपदावरून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात इंदापूरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिले आहे. गारटकर यांनी प्रतिस्पर्धी राजकीय नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांच्याशी हातमिळवणी केली आहे. या तिघांनी एकत्र येत 'कृष्णा भीमा विकास आघाडी'च्या वतीने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे इंदापूरचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
या बंडखोरीचे मुख्य कारण म्हणजे, इंदापूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना दिलेली उमेदवारी... गारटकर यांनी शहा यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला. या विरोधातूनच त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि भरत शहा यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता गारटकर आणि शहा यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.
advertisement
इंदापूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गारटकर आणि शहा यांच्यात सरळ लढत होणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, गारटकर आणि प्रवीण माने हे तिघे एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
शहा यांच्या उमेदवारीला गारटकर यांनी विरोध केला असून, पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शहा यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदासाठी 10 जणांनी अर्ज दाखल केला आहे. नगरसेवकपदासाठी 90 अर्ज आले आहेत. दरम्यान, प्रभागरचनेतील बदलामुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Indapur Election : इंदापूरमध्ये राजकीय भूकंप! विश्वासू सहकाऱ्यानेच दिलं अजित पवारांना आव्हान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement