Malhar Certificate: नितेश राणेंना धक्का, मल्हार सर्टिफिकेटवर जेजुरी संस्थानचा आक्षेप, माघार घेणार?
- Published by:sachin Salve
- Reported by:Chandrakant Funde
Last Updated:
नितेश राणेंनी हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका सर्टिफिकेट आणलं. पण त्याला आता जेजुरी ट्रस्टच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
पुणे : भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी मांस विक्रेत्यांना मल्हार झटका सर्टिफिकेट दिलं जाणार अशी घोषणा केली आहे. हलाल सर्टिफिकेटच्या धरतीवर हिंदू मांस विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. पण आता नितेश राणे यांच्या या घोषणेवर जेजुरी संस्थानने आक्षेप घेतला आहे. मल्हार हे नाव देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.
मत्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणेंनी मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केली आहे. नितेश राणेंनी हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका सर्टिफिकेट आणलं. पण त्याला आता जेजुरी ट्रस्टच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवला आहे. मटणाच्या वेबसाइटला हिंदु देवाचं नाव नको, अशी भूमिका जेजुरी संस्थान ट्रस्टने घेतल्याने नितेश राणेंची हलाल विरोधात मल्हार सर्टिफिकेट मटणाच्या बाजारात उतरवण्याजी ती कृती पुन्हा वादात सापडली आहे.
advertisement
नितेश राणेंनी नेमकी काय केली घोषणा
राज्यातील हिंदू मांस विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. झटका पद्धतीनं जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या हिंदू मांस विक्रेत्याना हे मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून केवळ हिंदू समाजातील मांस विक्रेत्यांना हे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे.
मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस (Meat) खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हलाल पद्धतीला एक प्रकारे झटका देण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
advertisement
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 'लाल मांस' नियमांमधून 'हलाल' हा शब्द काढून टाकला होता. त्यानंतर हलाल वरून बराच वाद रंगला होता. आता महाराष्ट्रात मल्हार सर्टिफिकेटवरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 11, 2025 9:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Malhar Certificate: नितेश राणेंना धक्का, मल्हार सर्टिफिकेटवर जेजुरी संस्थानचा आक्षेप, माघार घेणार?