लहानपणाच्या छंदातून करिअर बनलं, पुण्याच्या ओंकारचा सौदी, अमेरिकेपर्यंतचा प्रवास कसा झाला?

Last Updated:

ओंकार याला लहान पनापासूनच निसर्ग चित्र आणि व्यक्ती चित्र काढायला आवडतात.

+
News18

News18

पुणे, 26 सप्टेंबर : कला ही माणसाला समृद्ध बनवते. त्यामुळे कलाकार नेहमीच कोणत्याही गोष्टींमध्ये कला शोधत असतो. पुण्यातील ओंकार पवार याला लहान पनापासूनच  निसर्ग चित्र आणि व्यक्ती चित्र काढायला आवडतात. त्याने लहानपणी सुरु केलेला हा प्रवास आज सौदी अरेबिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांतही जाऊन पोहचला आहे. त्यामुळे त्याने या क्षेत्रात आतापर्यंत 25 ते 30 पुरस्कार देखील मिळवले आहेत. त्याच्या या प्रवासाला कशी सुरुवात झाली पाहूया.
कशी झाली सुरुवात?
ओंकार पवारचे शिक्षण पुण्यातील अभिनव कला विद्यालयात झालं. त्याला लहान पनापासूनच कलेची गरज वाटत होती. त्यामुळे तो चित्र काढणे शिकत गेला. निसर्ग चित्र आणि व्यक्ती चित्र म्हणजेच रिऍलिस्टिक आर्ट फॉर्म करायला त्याला आवडू लागले. 'चित्र मला नेहमी काही तरी शिकवत असते. माझ्या आयुष्यातलं पाहिलं चित्र म्हणजे गणपतीचं. घरा जवळ कुंभार वाडा होता आणि चित्र कलेचं बाळकडू तेथूनच मिळालं. जन्म संकष्टी चतुर्थीचाच त्यामुळे आत्याने माझं नाव ओंकार ठेवलं. त्यामुळे एक वेगळी जवळीक आहे. मी आता पर्यंत गणपतीचे अनेक चित्र काढली. आताच एक चित्र मलेशियात गेलं आणि त्याचा एक वेगळाच आनंद आहे. अमेरिकेत काही पोट्रेट आहेत, सौदेरिबीयेत निसर्ग चित्र, ऑस्ट्रेलियात ही काही पोट्रेट आहेत, जर्मनी मधील एका म्युझियममध्ये नॅशनल अवॉर्ड मिळालेलं चित्र संग्रहीत आहे, अशा सात ते आठ चित्र आहेत, असं ओंकार पवार सांगतो.
advertisement
एशियन गेम्सला जाण्यापूर्वी ऋतुराज गायकवाडनं घेतलं दगडूशेठ बाप्पाचं दर्शन, Video
'भारता मधील वेगवेगेगळ्या राज्यामध्ये ही माझी चित्र आहेत. गुजरात, कर्नाटक टूरिझम डिपार्टमेंटकडे काही मंत्रालयात आहेत. तुम्ही चित्रात किती एकरूप होता त्यावर ते किती वेळात होईल काही चित्र 10 ते 15 मिनिट तर एक तास तर काही एक दिवस ही लागतो. चित्रकला ही एक तपश्चर्या आहे. मला आता पर्यंत 25 ते 30 राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय अवॉर्ड मिळाले आहेत.
advertisement
मित्राचा तो सल्ला ऐकला अन् गड्याचं आयुष्यच बदललं! आज महिन्याला होतोय तब्बल इतका नफा
बॉम्बे आर्ट सोसायटीचा 'बेस्ट वॉटर कलर' साठीचा पुरस्कार माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तुमची जर खरोखर आवड आणि त्यामध्ये तुम्ही जर मनापासून काम केल त्यामध्ये यश हे नक्कीच मिळतं. कामावर प्रेम केलं तर खरोखर त्याचा भरघोस मोबदला मिळतो, पण त्यासाठी तेवढी किंमत मोजण्याची तयारी असावी लागते. आज समाजात माझी जी काही इमेज, किंमत आहे ती चित्रकलेची देण आहे. त्यामुळे मी चित्रकला जगतोय असं म्हणायला हरकत नाही. चित्रकलेणं मला आज घर, गाडी, स्टुडिओ सगळंच दिलं  आहे. मनापासून काम केल तर नक्कीच यशस्वी होऊ शकता, असं चित्रकार ओंकार पवार सांगतो.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
लहानपणाच्या छंदातून करिअर बनलं, पुण्याच्या ओंकारचा सौदी, अमेरिकेपर्यंतचा प्रवास कसा झाला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement