Kalicharan Maharaj : राम मंदिर उद्ध्वस्त करण्याचे मुसलमानांचे मनसुबे, कालिचरण महाराजांचे विधान
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पुण्यात दो धागे श्री राम के लिए आयोजित कार्यक्रमात राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीदेव महाराज यांनी एक भिती व्यक्त केली होती.
वैभव सोनावणे, 12 डिसेंबर : पुण्यात दो धागे श्री राम के लिए आयोजित कार्यक्रमात राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीदेव महाराज यांनी एक भिती व्यक्त केली होती. राम मंदिर उद्ध्वस्त करण्याचे काही लोकांचे मनसुबे असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आता या वक्तव्यावरच कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिलीय. कालीचरण महाराज यांनी राम मंदिर उद्ध्वस्त करण्याचे मुस्लिमांचे मनसुबे असल्याचं विधान केलंय. गोविंद गिरीदेव महाराजांनी व्यक्त केलेली भिती खरी असल्याचंही ते म्हणाले.
कालिपुत्र कालिचरण महाराज यांनी राम मंदिराबाबत मोठं विधान केलंय.कालिचरण महाराज म्हणाले की, मुसलमानांचेच मनसुबे आहेत. त्यांनी टीव्हीवरही सांगितलंय की २० वर्षानंतर लोकसंख्या वाढेल तेव्हा राम मंदिर पुन्हा फोडून टाकू . त्यांचे दोनाचे दहा होतात आणि हिंदूंचा दोनाचा एक होतो. ज्या महंतांनी भिती व्यक्त केलीय ती खरी आहे यात शंका नाही.
advertisement
काय म्हणाले होते गोविंद गिरीदेव?
भव्य असे राम मंदिर आपण उभा करत आहे. पण राम मंदिर फक्त उभा करून चालणार नाही तर रामाचे कार्य आणि मंदिराचे अस्तित्व कायम टिकण्यासाठी आपल्याला झटावं लागणार आहे. हजारो वर्षांपूर्वी आपली मंदिरे पाडली गेली. सातत्याने काही वर्षांनी मंदिरे का पाडली जातात? का उद्ध्वस्त होतात? याची कारणे तपासावी लागतील. आता राम मंदिर उभा राहत आहे, त्याच वेळी काही लोकांचे मनसुबे असे ते उद्ध्वस्त करण्याचे आहेत.
advertisement
पुण्यात मॉडर्न कॉलेजच्या मैदानावर दो धागे श्री राम के लिए या कार्यक्रमांच आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमासाठी गोविंद गिरीदेव महाराज आले होते. ते श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष आहेत. या कार्यक्रमात आरएसएसचे माजी सहकार्यवाहक आणि राम मंदिर ट्रस्टचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 12, 2023 1:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Kalicharan Maharaj : राम मंदिर उद्ध्वस्त करण्याचे मुसलमानांचे मनसुबे, कालिचरण महाराजांचे विधान











