पोलीस अचानक पोहोचले; दिसल्या 8 टाक्या, झाकण उघडताच समोर आलं सानियाचं ते कांड, वस्तीत उडाली खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पठारे वस्ती येथे सुरू असलेल्या या दारू निर्मिती केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन जागेवरच नष्ट केले आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने खेड तालुक्यातील बहुळ गावच्या हद्दीत मोठी कारवाई केली. युनिटने इथे एका अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. पठारे वस्ती येथे सुरू असलेल्या या दारू निर्मिती केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन जागेवरच नष्ट केले आहे. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
२९०० लिटर रसायनाचा साठा जप्त
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी (दि. १०) पठारे वस्ती येथे अचानक छापा टाकला. या कारवाईत सानिया शुभम राजपूत हिच्या मालकीच्या ८ मोठ्या प्लास्टिक टाक्या मिळून आल्या. यामध्ये सुमारे २९०० लिटर उग्र वासाचे गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन भिजत घातले होते.
पोलिसांनी घटनास्थळीच सर्व टाक्यांमधील रसायन सांडून ते नष्ट केले. या रसायनाची आणि प्लास्टिक टाक्यांची एकत्रित किंमत १ लाख ४५ हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी ही सर्व कारवाई अत्यंत शिताफीने केली.
advertisement
अवैध दारू निर्मितीमुळे परिसरात गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत होती. गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई म्हणजे अवैध धंदेवाल्यांना दिलेला मोठा इशारा मानला जात आहे. महिला आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता या दारूचे जाळे कोठपर्यंत पसरले आहे आणि यात अन्य कोणाचे हात आहेत का, याचा तपास करत आहेत. या धाडसी कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 2:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पोलीस अचानक पोहोचले; दिसल्या 8 टाक्या, झाकण उघडताच समोर आलं सानियाचं ते कांड, वस्तीत उडाली खळबळ









