Krushi Market Today: सोयाबीन-कांद्याचे दर वाढले, जाणून घ्या इतर शेतमालांचे भाव?

Last Updated:

सोमवार , दिनांक 13 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, मका व कांद्याची आवक आणि भाव पाहू.

+
कांदा

कांदा हा भारतीय स्वयंपाकघरातील खूपच महत्वाचा भाग आहे. कांदा हा जवळजवळ सगळ्याच भाज्यांमध्ये वापरला जातो आणि त्याला दुसरा कोणताच पर्याय नाही. कांद्याशिवाय जेवण बनवणं कठीण होतं. पण कधीकधी कांदा इतका महाग होतो की तो गृहिणींना परवडत नाही. अशात कधीकधी काही गृहिणी कांदा घरात भरुन ठेवतात. पण पावसाळ्यात ओला कांदा असल्यामुळे किंवा कधीकधी ओलावा तयार होत असल्यामुळे कांदे खराब होता, हळूहळू सडू लागतात आणि आपल्यासोबत आजूबाजूचे कांदे देखील खराब होऊ लागतात.

मुंबई: सोमवार , दिनांक 13 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, मका व कांद्याची आवक आणि भाव पाहू.
अशी राहिली मका आवक: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 16 हजार 698 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 4 हजार 50 क्विंटल सर्वाधिक मका आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1325 ते जास्तीत जास्त 2168 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल मक्यास सर्वाधिक 2450 रुपये भाव मिळाला.
advertisement
कांद्याची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 2लाख, 53 हजार 678 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख, 47 हजार 872 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 270 ते जास्तीत जास्त 1316 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 480 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1500 ते 2750 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच ठाणे मार्केटमध्ये 3 क्विंटल कांद्यांची सर्वात कमी आवक होऊन त्यास 900 रुपये बाजार भाव मिळाला.
advertisement
सोयाबीन उत्पादकांची कोंडी: राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची 1 लाख, 18 हजार 984 क्विंटल एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 42 हजार 067 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3500 ते 4271 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 700 क्विंटल सोयाबीनला 3790 ते 4386 दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला.
advertisement
सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सोयाबीनसाठी 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला; तरी शासकीय खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून अवघ्या 4400 रुपयांमध्ये सर्वाउत्तम दर्जाचे सोयाबीन लुटले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फरपट आणि पदरात तोटा कायम आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Krushi Market Today: सोयाबीन-कांद्याचे दर वाढले, जाणून घ्या इतर शेतमालांचे भाव?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement