Mahapareshan bharti 2025: पुणे महापारेषणमध्ये नोकरभरती, 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

Last Updated:

Mahapareshan bharti 2025: महापारेषण पुणे अंतर्गत शिकाऊ इलेक्ट्रिशियन पदे भरण्यासाठी संस्थेने अधिकृत सूचना जारी केली आहे. यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mahapareshan bharti 2025: पुणे महापारेषणमध्ये नोकरभरती, 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
Mahapareshan bharti 2025: पुणे महापारेषणमध्ये नोकरभरती, 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
महापारेषण पुणे अंतर्गत शिकाऊ इलेक्ट्रिशियन पदे (Apprentice – Electrician Post) भरण्यासाठी संस्थेने अधिकृत सूचना जारी केली आहे. यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीमुळे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना चांगली संधी मिळाली आहे. अर्ज करण्यासाठी 24 ऑक्टोबर 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अंतिम तारखेच्या आत सर्व आवश्यक कागदपत्रांसह इच्छुक उमेदवारांना अर्ज भरायचा आहे. याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्याची लिंक पाहण्यासाठी खालील तपशील वाचा.
Mahapareshan Job Vacancies मध्ये पदाचे नाव- महापारेषण पुणे अंतर्गत शिकाऊ इलेक्ट्रिशियन पदे (Apprentice – Electrician Post) उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
  • पदसंख्या - इलेक्ट्रीशियन उमेदवारांच्या 15 जागा उपलब्ध आहे.
  • शैक्षणिक पात्रता - महापारेषण पुणे अंतर्गत शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. उमेदवारांनी इयत्ता 10 वी उत्तीर्णचे गुणपत्रक (Marksheet) व मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आयटीआय (वीज तंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
  • नोकरी ठिकाण - पुणे.
  • वयोमर्यादा - या पदासाठी १८ ते ३० वर्षे वयोमर्यादा आहे. (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे शिथिलक्षम)
  • अर्ज पद्धती - भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 आहे.
  • अधिकृत वेबसाईट - महापारेषण पुणे यांच्या https://www.mahatransco.in/ या अधिकृत लिंकवर तुम्ही अर्ज करू शकता.
advertisement
जाहिरात PDF मध्ये, उमेदवारांसाठी एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांची निवडप्रक्रिया प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना पुढे दिलेल्या पत्त्यावर आणि सांगितलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर व्हायचे आहे. सर्व उमेदवारांनी 30 ऑक्टोबर 2025 रोजी मुळ कागदपत्रांसह आणि दोन छायांकित अर्जासाठी निवडीसाठी उपरोक्त कार्यालयीन पत्त्यावर ठिक सकाळी 11:00 वाजता उपस्थित राहायचे आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. पत्ता- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अ उ दा सं व सु विभाग- 2, पुणे, सर्वे नं. 121, नवीन पर्वती उपकेंद्र आवार, पहिला मजला, पु.ल. देशपांडे उद्यानाजवळ, सिंहगड रस्ता, पुणे: 411 030
advertisement
जाहिरातीच्या PDF ची लिंक- https://drive.google.com/file/d/1yPaGzgko5oz0ZsT_P8WO6PVakhCVcjT7/view
Mahapareshan Recruitment Important Documents For Application: आवश्यक कागदपत्रांची यादी-
  • एस.एस.सी. मार्क शीट/ प्रमाणपत्र
  • आय.टी.आय. मार्कशिट (चार सेमिस्टरची)
  • जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) चे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Mahapareshan bharti 2025: पुणे महापारेषणमध्ये नोकरभरती, 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement