advertisement

Weather Alert : राज्यात हवापालट होणार, पुढील 72 तास महत्त्वाचे, हवामान विभागाने दिला इशारा

Last Updated:

वाढत्या उष्णतेपासून राज्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे. 4 ते 6 मे दरम्यान संपूर्ण राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

+
News18

News18

पुणे : वाढत्या उष्णतेपासून राज्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे. 4 ते 6 मे दरम्यान संपूर्ण राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर हा पूर्व विदर्भात जास्त असणार आहे. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. पाहुयात 3 मे रोजी संपूर्ण राज्यामध्ये तापमान व हवामान कसं असेल.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसकिमान तापमान 26 असणार आहे. आद्रता असल्याने मुंबईकरांना उकाडा जाणवू शकतो. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर पुण्यामधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे असेल. पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस विजांसह होऊ शकतो. नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
advertisement
आगामी काही काळामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये तापमानाचा पारा हा चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळते. अगदी तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्याचे पाहायला मिळालेमराठवाड्यातील लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी अलर्ट केले आहेतयवतमाळवर्धाचंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टउर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भामध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Weather Alert : राज्यात हवापालट होणार, पुढील 72 तास महत्त्वाचे, हवामान विभागाने दिला इशारा
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement