Manoj Jarange : संभाजीराजेंचा जरांगे पाटलांना फोन, जरांगे पाटील राजेंच्या विनंतीचा मान राखणार?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
संभाजीराजे छत्रपती यांनी आज मनोज जरांगे पाटील यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
पुणे, 29 ऑक्टोबर, चंद्रकांत फुंदे : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठी समाजाच्या आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. तसेच त्यांना पाणी पिण्याची विनंती केली होती. जरांगे पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या विनंतीचा मान ठेवत पहिल्या दिवशी पाणी पिलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी जरांगे पाटील यांना फोन केला आहे.
नेमकं काय म्हणाले संभाजीराजे?
संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून त्यांच्या तब्यतेची चौकशी केली आहे. आपण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत आहात, आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण उपोषण करत आहात, ते ठीक आहे. परंतु आपण निदान पाणी तरी प्यावं असं संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांना म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या विनंतीचा मान राखून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवशी पाणी पिलं होतं. आता पुन्हा एकदा संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला आहे.
advertisement
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचा फटका हा संजय राऊत यांना देखील बसला आहे. त्यांना दौंडमधील आपली रॅली आज रद्द करावी लागली.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
Oct 29, 2023 3:22 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Manoj Jarange : संभाजीराजेंचा जरांगे पाटलांना फोन, जरांगे पाटील राजेंच्या विनंतीचा मान राखणार?








