Pune rain Alert: मुंबईलाच नव्हे, पुण्यालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी...
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पुणे: एकीकडे मुंबई शहर आणि उपनगरांना पावसाने झोडपून काढलं आहे. कोकण आणि मुंबई ठाण्यातील शाळांना सुट्टी दिली आहे. आता पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील 12 वी पर्यंतच्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनीन दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या योजना आखण्यात आल्या आहेत. तथापी मुख्यध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे. नागरिकांना सावधानता बाळगावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
July 08, 2024 10:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune rain Alert: मुंबईलाच नव्हे, पुण्यालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी...


