Mumbai Pune: साडेतीन तास नव्हे, अवघ्या 90 मिनिटांत मुंबईतून पुण्यात, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Pune: मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबईहून पुण्याचा प्रवास साडेतीन तासांत होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता हाच प्रवास 90 मिनिटांत करण्याचा नवा प्लॅन सांगितला आहे.
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईहून पुण्याचं अंतर केवळ तीन तासांत पार करता येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. तरीही या प्रवासाला सध्या किमान साडेतीन ते चार तास लागतात. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता नवीन प्लॅन सांगितला असून मुंबईहून पुणे अवघ्या 90 मिनिटांत पूर्ण होणार आहे. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गडकरींनी मुंबई आणि पुणेकरांसाठी नवी घोषणा केली.
सध्या मुंबई ते बंगळुरू असा नवीन महामार्ग तयार करण्यात येत आहे. हा महामार्ग अटल सेतूला जोडण्यात येणार असून त्यामुळे मुंबईहून पुण्याला अवघ्या दीड तासात पोहोचणं शक्य होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. तसेच माझ्या विभागाकडे भरपूर पैसा पडलेला असून तो खर्च करणारे नाहीत, असे सांगत गडकरींनी सत्काराला उत्तर देताना सर्वांचे लक्ष वेधले.
advertisement
दरम्यान, पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार वितरण सोहळा झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकमान्य टिळक स्मारक समितीचे अध्यक्ष रोहित टिळक उपस्थित होते.
गडकरी स्पष्टवक्ते – फडणवीस
view commentsलोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींचे कौतुक केले. राजकारमात सत्य माहिती असूनही ते बोलू नये, असे मानले जाते. मात्र, गडकरी कोणत्याही परिस्थितीत हमखास सत्यच बोलतात. कितीही नुकसान झाले तरी ते मनात आहे तेच बोलतात. सोयीचे किंवा राजकारणाला पटेल असे ते बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा हाच स्पष्टवक्तेपणा लोकांना जास्त आवडतो,” असे फडणवीस म्हणाले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 03, 2025 1:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai Pune: साडेतीन तास नव्हे, अवघ्या 90 मिनिटांत मुंबईतून पुण्यात, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन!


