MPSC Exam Date : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 6 जुलैची राज्यसेवा पूर्व परीक्षा आता नव्या तारखेला
- Published by:Rahul Punde
Last Updated:
MPSC Exam Date : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 6 जुलै रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
पुणे, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 6 जुलै रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ज्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्येही बदल करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रवर्गातील एकूण 524 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजाच्या युवकांना ओबीसी कोट्यातून फार्म भरता यावा, यासाठी
राज्यसेवा आयोगाने वेळापञकात बदल केला आहे. नवीन वेळापञकानुसार यापूर्वी ईडबल्यू मधून फॉर्म भरलेल्या मुलांना कुणबी दाखले असून ओबीसीतून परिक्षा देता येणार नव्हती. म्हणून आयोगाने mpsc च्या वेळापत्रकात बदल करून मराठा समाजाच्या मुलांना ही नवी संधी उपलब्ध करून दिलीय. या प्रक्रियेला वेळ देता यावा म्हणून परीक्षेची तारीख पुढे ढकललीय.
advertisement
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 30, 2024
advertisement
काय म्हटलंय आयोगाने?
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता दिनांक 8 मे, 2024 च्या शुद्धिपत्रकानुसार एकूण 524 रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदी च्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती.
advertisement
वाचा - हवं तर मला फाशी द्या, मी मनुस्मृतीला विरोध करणारच; आव्हाडांनी भाजपला सुनावलं
view commentsत्यास अनुसरून शासनाने, शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण 2024/प्र.क्र.137/आरक्षण-05, दिनांक 28 मे, 2024 अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा (OBC) दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयाधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेसाठी 6 जुलै रोजी होणारी परीक्षा आता 21 जुलै रोजी होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 30, 2024 4:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
MPSC Exam Date : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 6 जुलैची राज्यसेवा पूर्व परीक्षा आता नव्या तारखेला


