advertisement

Pune News: अपघात रोखण्यासाठी मास्टर प्लॅन, ही’ चूक करण्याआधी हजारदा विचार करा, मुंबई-पुणे मार्गावर...

Last Updated:

Pune News: रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

Pune News: अपघात रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन ठरला, मुंबई-पुणे महामार्गावर अंमलबजावणी सुरू
Pune News: अपघात रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन ठरला, मुंबई-पुणे महामार्गावर अंमलबजावणी सुरू
पुणे: रस्ते अपघातामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी वाढ पाहायला मिळाली. यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो. हे रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असून रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. अपघात कमी करण्यासाठी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या चालकावर कारवाई करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
अतिवेगावर नियंत्रणासाठी स्पीड कॅमेऱ्यांचा वापर
रोड सेफ्टी आणि ग्लोबल सेफ्टी पार्टनरशिप यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या पायलट प्रकल्पाची अंमलबजावणी लोणावळा आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली आहे. जुन्या मुंबई–पुणे महामार्गासह काही महत्त्वाच्या ठिकाणी टू-कॅम लेझर स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
अत्याधुनिक कॅमेरे ताशी तब्बल 320 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाहनांचा अचूक वेग मोजण्यास सक्षम आहेत. तसेच हे कॅमेरे दिवस आणि रात्री दोन्ही वेळेस प्रभावीपणे कार्य करतात. या कॅमेऱ्यांच्या मदतीने केवळ अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवरच नव्हे, तर सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे अशा विविध वाहतूक नियमभंगांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
advertisement
अपघात कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, पुणे ग्रामीण भागातील प्राणघातक रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी यांचे प्रमाण जास्त आहे. अतिवेग हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे कडक अंमलबजावणी आणि जनजागृतीच्या माध्यमातून अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींची संख्या कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
उपलब्ध आकडेवारीनुसार, 2023 मध्ये पुणे ग्रामीण भागात रस्ते अपघातांमध्ये 983 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली होती. दरम्यान, मे 2025 मध्ये 40 पोलीस अधिकाऱ्यांना लेझर स्पीड कॅमेऱ्यांच्या वापराबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये कॅमेऱ्यांची मांडणी, प्रत्यक्ष अंमलबजावणी, तसेच पुरावे संकलन आणि त्यांचे व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: अपघात रोखण्यासाठी मास्टर प्लॅन, ही’ चूक करण्याआधी हजारदा विचार करा, मुंबई-पुणे मार्गावर...
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement