Pune : मैत्रिणीच्या घरी जेवायला गेला अन् तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; तरुणीच्या घरात नेमकं घडलं काय?
Last Updated:
Pune Crime News : कोंढव्यातील पिसोळी भागात प्रेमप्रकरणातून नायजेरियन तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोन नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पुणे : कोंढव्यातील पिसोळी परिसरात प्रेमप्रकरणातून एका नायजेरियन तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोन नायजेरियन तरुणांना ताब्यात घेतले असून इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हसत-खेळत गेला जेवायला, पण परतलाच नाही
येमेका क्रिस्टीएन (वय 40) असे मृत तरुणाचे नाव असून तो सध्या फुरसुंगी येथे वास्तव्यास होता.मात्र तो मूळचा नायजेरियाचा होता. या प्रकरणात नायेमेका मदुबची ओनिओ आणि किन्सली ओबा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही माहिती काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार,पिसोळीतील बालाजी पद्मावतीनगर भागात राहणाऱ्या एका नायजेरियन महिलेने सोमवारी (12 जानेवारी) काही मित्रांना जेवणासाठी घरी बोलावले होते. जेवणासाठी येमेका क्रिस्टीएन, किन्सली, ओबी, ओजे ओजगवा आणि नायेमेका मदुबची ओनिया हे तिच्या घरी गेले होते.
advertisement
दरम्यान, प्रेमप्रकरणाच्या कारणावरून येमेका क्रिस्टीएन याचा नायेमेका मदुबची ओनिया, किन्सली, ओबी आणि ओजे ओजगवा यांच्याशी वाद झाला. हा वाद वाढत जाऊन मारहाणीत बदलला. चौघांनी मिळून क्रिस्टीएनला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत त्याचा मित्र गिफ्ट सिव्होनस ऊटाह याने क्रिस्टीएनला वानवडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 8:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : मैत्रिणीच्या घरी जेवायला गेला अन् तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; तरुणीच्या घरात नेमकं घडलं काय?







