आधी गोळीबार मग कोयत्याने वार, 15 मिनिटांत घायवळ टोळीचे 2 कांड, मध्यरात्री पुणे हादरलं!

Last Updated:

Nilesh Ghaiwal Gang Update: पुण्यातील कोथरुड परिसरात काल मध्यरात्री दोन रक्तरंजित घटना घडल्या आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड घायवळ टोळीने अवघ्या १५ मिनिटांत दोन कांड केले आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यातील कोथरुड परिसरात काल मध्यरात्री दोन रक्तरंजित घटना घडल्या आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड घायवळ टोळीने अवघ्या १५ मिनिटांत दोन कांड केले आहे. हल्लेखोरांनी आधी एका व्यक्तीवर गोळीबार केला. यानंतर अवघ्या १५ मिनिटांत आणखी एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले आहेत. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत घायवळ टोळीतील पाच गुंडांना अटक केली आहे.
मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड आणि गणेश राऊत असं अटक केलेल्या चार आरोपींची नावं आहेत. या चारजणांसोबत आणखी एका अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हे पाचही आरोपी घायवळ टोळीचे सदस्य आहेत. या पाचही जणांनी बुधवारी मध्यरात्री पुण्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथले भाई आहोत, असं म्हणत त्यांनी हे गुन्हेगारी कृत्य केल्याची माहिती पुण्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
advertisement
पुण्यात मध्यरात्री घडलेल्या दोन्ही घटनांवर प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, "ही घटना काल रात्री कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. घायवळ टोळीतील गुंडांनी केवळ गोळीबार नाही केला, तर अजून एकाला कोयत्याने मारहाण देखील केली आहे. काल रात्री १२ च्या दरम्यान गोळीबार घडला आणि त्यानंतर याच आरोपींनी अजून एका व्यक्तीला कोयत्याने मारहाण केली.
advertisement
प्रकाश धुमाळ अस गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर वैभव साठे याला कोयत्याने मारहाण केली आहे. चार आरोपी दोन गाड्यांवर आले आणि गोळीबार केला. आम्ही इथले भाई आहोत, म्हणत त्यांनी हा गोळीबार केला. यात त्यांनी एक गोळी फायर केली होती. ती धुमाळ यांच्या मांडीला लागली. यानंतर आरोपींनी रात्री आणखी एकाला कोयत्याने वार करत जखमी केलं.
advertisement
हे सगळे घायवळ टोळीचे आरोपी आहेत. सगळे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात काल रात्री २ गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींवर याआधीच मोक्का आणि ३०७ सारखे गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या प्रकरणात निलेश घायवळ याचा काही सहभाग आहे का? याची चौकशी सुरू आहे. मयूर कुंभारे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख आणि इतर काही आरोपींवर गुन्हा दाखल असून यांना ताब्यात घेतले आहेत
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आधी गोळीबार मग कोयत्याने वार, 15 मिनिटांत घायवळ टोळीचे 2 कांड, मध्यरात्री पुणे हादरलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement