Pune Crime : पुणे पोलिसांनी मुळावर घातला घाव, निलेश घायवळच्या आई-वडिलांना नोटीस, लंडनमध्येच अटक होणार?

Last Updated:

Nilesh Ghaiwal Parents get notice : पुणे पोलिसांनी शहरातील कुख्यात टोळीप्रमुख निलेश घायवळ याच्या आई-वडिलांना नोटीस पाठवली आहे. निलेश घायवळ याला हजर करावे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Nilesh Ghaiwal Parents get notice from Pune police
Nilesh Ghaiwal Parents get notice from Pune police
Pune Crime News (अभिजित पोटे, प्रतिनिधी) : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडनमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे. युके हायकमिशनकडून पुणे पोलिसांना याबाबत उत्तर देण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा निलेश घायवळचा युकेमधील व्हिसा आहे. मुलगा लंडनमध्ये शिकत असल्याने निलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची माहिती युके हायकमिशनकडून पुणे पोलिसांना देण्यात आली आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी पुण्यात मोठी कारवाई केली आहे.

निलेश घायवळच्या आई-वडिलांना नोटीस

पुणे पोलिसांनी शहरातील कुख्यात टोळीप्रमुख निलेश घायवळ याच्या आई-वडिलांना नोटीस पाठवली आहे. पुणे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी निलेश घायवळ याला हजर करावे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. निलेश घायवळ याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यामुळे त्याला तातडीने चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर करणं बंधनकारक आहे, असंही पुणे पोलिसांनी बजावलं आहे. त्यामुळे आता निलेश घायवळ याचा पाय खोलात गेल्याचं पहायला मिळतंय.
advertisement

आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई करणार?

पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की, जर निलेश घायवळ याला चौकशीसाठी हजर केले नाही, तर त्याच्या आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई केली जाईल का? असा सवाल आहे. पोलीस सूत्रांनुसार, ही नोटीस 2 दिवसांपूर्वी घायवळच्या आई-वडिलांना पाठवण्यात आली आहे. निलेश घायवळ हा पोलिसांना फरार असलेला आरोपी असून, त्याच्याविरुद्धच्या गुन्हे आणि तपासाच्या अनुषंगाने त्याला पोलीस चौकशीसाठी हजर करणं आवश्यक आहे. त्यामुळे आता UK मध्ये देखील घायवळच्या मुसक्या आवळल्याची तयारी होताना दिसतीये.
advertisement

युकेच्या हाय कमिशनला पत्र

दरम्यान, पुणे पोलिसांनी युकेच्या हाय कमिशनला पत्र लिहून निलेश घायवळचा शोध घेऊन त्याला ताब्यात घ्या अशी मागणी केली. निलेश घायवळला अटक करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार सुरू आहे. पुणे पोलिसांनी पाठवलेल्या पत्राला युके हाय कमिशनने उत्तर दिलं होतं. अशातच आता निलेश घायवळला लंडनमध्येच अटक होणार का? असा सवाल विचारला जात आहे. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी घायवळचा फास आणखी आवळल्याचं पहायला मिळतंय.
advertisement

निलेश घायवळची आई म्हणाल्या...

दरम्यान, माझ्या लेकराला कुठंही पळून जायचं नव्हतं. तो पळून गेला नाही. मी स्वत: त्याला विमानतळावर सोडायला गेले होते. त्याने कोणताही पासपोर्टमध्ये घोटाळा केला नाही. राजकारणी लोकं त्याला त्रास देण्यासाठी असं करत आहेत. निलेश घायवळला राजकारणात प्रवेश करायचा होता. दोन महिन्यावर ज्या निवडणुका आल्या आहेत. त्याला निवडणुकीत उभं रहायचं होतं, असं निलेश घायवळची आई म्हणाल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुणे पोलिसांनी मुळावर घातला घाव, निलेश घायवळच्या आई-वडिलांना नोटीस, लंडनमध्येच अटक होणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement