Rakhi Sawant : 'सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या', पण का? राखी सावंतचा VIDEO VIRAL
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rakhi Sawnat : राखीचा पापाराझी व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात राखीने तिच्या दोन्ही किडन्या विकल्याचा दावा केला आहे.
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत दुबईत होती. दुबईहून ती नुकतीच मुंबईत आली आहे. काही दिवसांतच ती बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे. दरम्यान राखीचे एक्स्ट्रा ड्रामे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. नवरा आदिल खानबरोबर झालेल्या वादानंतर राखी देश सोडून दुबईत गेली होती. दुबईला जाऊन तिने काय काय केलं? ती आता किती श्रीमंत झाली आहे हे तिने सांगितलं.
राखीचा पापाराझी व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात राखीने तिच्या दोन्ही किडन्या विकल्याचा दावा केला आहे. दोन्ही किडन्या सलमान खानसाठी विकल्याचाही दावा तिने केला आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
advertisement
राखी सावंत नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा पापाराझींशी बोलताना राखीने सांगितलं की मी सलमान भाईसाठी सोन्याची अंगठी आणली आहे. बिग बॉसमधील तान्या मित्तलच्या श्रीमंतीवरून तिने टोला लगावला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणते, "मी सोन्याची पर्स खरेदी केली आहे आणि सलमान भाईसाठी मोठी सोन्याची अंगठी खरेदी केली आहे. त्यासाठी मी माझ्या दोन्ही किडन्या विकल्या. माझ्या दोन्ही किडन्या विकून मी हे सगळं काही केलं आहे. सलमान भाईसाठी किडनीच काय, मी काहीही विकू शकते."
advertisement
advertisement
राखी आणि सलमान खान यांचं प्रेम कधीच लपलेलं नाही. राखी सलमान खानला तिचा भाऊ मानते. राखीच्या अनेक कठीण प्रसंगी सलमान खानने तिला मदत केली आहे. राखी तिला जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा सलमान खानचं कौतुक करायची संधी सोडत नाही.
advertisement
राखी पुढे म्हणाली, "मी इतकी श्रीमंत आहे की केसांना कलर करण्यासाठी दुबईला जाते." राखी तिच्या व्हिडीओमधून तान्या मित्तलला टोमणे मारताना दिसते. लवकरच ती बिग बॉसच्या घरात जाणार आहे. घरात गेल्यानंतर सगळ्यात राखी तान्या मित्तलचीच शाळा घेणार असं दिसतंय. राखी बिग बॉसच्या घरात कधी जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 10:04 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rakhi Sawant : 'सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या', पण का? राखी सावंतचा VIDEO VIRAL


