मोठी बातमी! आरक्षणासाठी पुण्यात सकल मराठा समाजाकडून महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज मराठा व मराठा-कुणबी आरक्षणाबाबत पुण्यात सकल मराठा समाजाकडून महत्वपूर्ण परीषदेच आयोजन करण्यात आलं आहे.
पुणे, 24 सप्टेंबर, चंद्रकांत फुंदे : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर अखेर त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र दुसरीकडे या मागणीला कुणबी आणि ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज मराठा व मराठा-कुणबी आरक्षणाबाबत पुण्यात सकल मराठा समाजाकडून महत्वपूर्ण परीषदेच आयोजन करण्यात आलं आहे. परीषदेला अनेक ज्येष्ठ विधिज्ञ, संख्या शास्त्रज्ञ, समाज शास्त्रज्ञ, अर्थ शास्त्रज्ञ व इतिहास तज्ज्ञ आणि आरक्षण अभ्यासकांनी हजेरी लावली आहे. मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती, कायदेशीर अडचणी व उपाययोजना अशा विविध मुद्द्यांवर या परिषदेमध्ये चर्चा सुरू आहे.
advertisement
कुणबी समाजाचा विरोध
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्याकडून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे या मागणीला कुणबी आणि ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी मागणी समाजातील विविध संघटनांकडू करण्यात आली आहे. यासाठी नागपुरात आंदोलन सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 24, 2023 2:39 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मोठी बातमी! आरक्षणासाठी पुण्यात सकल मराठा समाजाकडून महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती