12 वर्षांच्या सिदराच्या कलाकृतीची आंतरराष्ट्रीय झेप, दक्षिण कोरियातील प्रदर्शनासाठी झाली निवड, काय आहे खास? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
सिदरा अन्सारी हिने क्यूबिझम शैलीत तयार केलेली कलाकृती थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी येथील फकीरभाई पानसरे उर्दू सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा येथे शिकणारी सिदरा अन्सारी हिने क्यूबिझम शैलीत तयार केलेली कलाकृती थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. क्यूबिझम शैलीत साकारलेल्या तिच्या चित्राची निवड दक्षिण कोरियातील गुंसान आंतरराष्ट्रीय बाल कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. याविषयीची माहिती लोकल 18 सिदरा अन्सारीने दिली आहे.
सिदरा अन्सारी हिने सांगितलं की, तिला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. शाळा तसेच चित्रकलेच्या शिक्षकांनी सातत्याने प्रोत्साहन दिल्याने ही आवड अधिक वाढली. शाळेमार्फतच या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची माहिती मिळाली आणि त्यानंतर तिने यामध्ये सहभाग नोंदवल्याचं सांगितलं.
advertisement
दक्षिण कोरियातील प्रदर्शनासाठी निवड
view commentsदक्षिण कोरियात होणाऱ्या या प्रदर्शनाबाबतचा ई-मेल तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांना आला होता. त्यानंतर महापालिकेच्या कला शिक्षण विभागाने विविध शाळांतील विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देऊन चित्रे मागवली. आलेल्या चित्रांचे परीक्षण केल्यानंतर सिदरा अन्सारीसह आणखी 27 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या सर्व कलाकृतींना स्थान मिळणारं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन लवकरच दक्षिण कोरियात भरवले जाणार आहे. सिदरा अन्सारीच्या चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्थान मिळाल्यामुळे तिचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 11, 2025 3:36 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
12 वर्षांच्या सिदराच्या कलाकृतीची आंतरराष्ट्रीय झेप, दक्षिण कोरियातील प्रदर्शनासाठी झाली निवड, काय आहे खास? Video









