गाडीचा नंबर हवाय 'व्हीआयपी'? पिंपरी आरटीओमध्ये 'NB' मालिका सुरू; असा करा अर्ज
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांमध्ये मोठी चढाओढ असण्याची शक्यता आहे
पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) वाहनांसाठी 'एनबी' (NB) ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्याची घोषणा केली आहे. या मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांमध्ये मोठी चढाओढ असण्याची शक्यता असून, यासाठी आरटीओ प्रशासनाने लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे.
चारचाकी वाहनधारकांसाठी सुवर्णसंधी: जर चारचाकी वाहनधारकांना 'एनबी' मालिकेतील एखादा खास क्रमांक हवा असेल, तर त्यांना तो तीनपट शुल्क भरून मिळवता येईल. यासाठी इच्छुक वाहनमालकांनी २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २:३० या वेळेत आरटीओ कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य आहे.
advertisement
दुचाकींसाठी लिलाव प्रक्रिया: दुचाकी वाहनांसाठी उरलेले आकर्षक क्रमांक राखीव ठेवण्याची प्रक्रिया २१ जानेवारी रोजी पार पडेल. चारचाकी क्रमांकांची यादी २१ जानेवारीला नोटीस बोर्डवर लावली जाईल. जर एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले, तर जास्त बोली लावणारे अर्जदार त्याच दिवशी दुपारी २:३० पर्यंत सीलबंद पाकिटात वाढीव रकमेचा डीडी जमा करू शकतात. दुचाकींची यादी आणि लिलाव प्रक्रिया २२ जानेवारी रोजी पूर्ण होईल.
advertisement
पारदर्शक प्रक्रिया: प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी माहिती दिली की, क्रमांक राखीव झाल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी वाहनधारकांनी मूळ पावती प्राप्त करावी. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून, गर्दी टाळण्यासाठी अर्जदारांनी ठरलेल्या वेळेतच आपली कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:24 PM IST










