Pune News: सरकारी योजनेतून स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न पडलं महागात; 20 लाखांचा गंडा, पिंपरीतील घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
नागरिकांना सरकारी आणि खासगी गृहनिर्माण योजनांमध्ये कमी दरात घरे मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात नागरिकांना सरकारी आणि खासगी गृहनिर्माण योजनांमध्ये कमी दरात घरे मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. यात एका कुटुंबातील तिघांनी मिळून नऊ जणांची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरीतील नेहरूनगरमधील स्वप्ननगरी सोसायटी परिसरात हा फसवणुकीचा डाव साधण्यात आला.
याप्रकरणी उमाकांत रामदास ढाके, एक संशयित महिला आणि शुभम उमाकांत ढाके (सर्व रा. पिंपरी) या तिघांविरोधात संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताजुद्दीन कमला शेख (वय ४४, रा. घरकुल, चिखली) यांनी शनिवारी यासंदर्भात फिर्याद दिली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २९ जुलै २०२४ ते २९ नोव्हेंबर २०२५ या सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत फिर्यादीसह इतर आठ नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यांनी स्वस्त दरात घरे मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन या नऊ जणांकडून वेळोवेळी विविध कागदपत्रांच्या आणि प्रक्रियेच्या नावाखाली २० लाख रुपये उकळले. मात्र, ठरल्याप्रमाणे घरे न देता, आरोपींनी नागरिकांशी संपर्क साधणे टाळण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींची टोळी आणखी किती जणांना फसविण्यात यशस्वी झाली, याचा शोध घेत आहेत. मात्र, नागरिकांनी अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवून पैसे गुंतवण्याआधी पूर्ण माहिती घ्यावी, असं आवाहनही करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 01, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: सरकारी योजनेतून स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न पडलं महागात; 20 लाखांचा गंडा, पिंपरीतील घटना


