लोकमान्य टिळक पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Last Updated:

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हा अविस्मरणीय अनुभव आहे. थेट टिळकांशी जोडलेल्या या संस्थेकडून पुरस्कार मिळणं हे माझं भाग्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
पुणे, 01 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, उत्तरीय, सन्मान पत्र, ट्रॉफी आणि रोख रक्कम एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराची रक्कम नमामी गंगे प्रकल्पाला दान केलीय. पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीला कोटी कोटी नमन, छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी, चाफेकरांची भूमी, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठेंची ही भूमी असल्याचं मोदी म्हणाले. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. दोघांनाही नमन करतो.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हा अविस्मरणीय अनुभव आहे. थेट टिळकांशी जोडलेल्या या संस्थेकडून पुरस्कार मिळणं हे माझं भाग्य आहे. काशी आणि पुण्याची विशेष ओळख आहे. इथं विद्वत्तेला अमरत्व प्राप्त झालं आहे. तिथं हा पुरस्कार मिळणं हा संतोष आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढलीय असंही नरेंद्र मोदी म्हणाले. माझा हा पुरस्कार मी 140 कोटी जनतेला अर्पण करतो असं मोदींनी म्हटलं.
advertisement
स्वातंत्र्यलढ्यातील टिळकांच्या योगदानाबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, टिळकांच्या काळात झालेल्या स्वतंत्रता आंदोलनात सगळ्यांवर टिळकांचा प्रभाव होता. यामुळेच ब्रिटीशांनी त्यांना असंतोषाचे जनक म्हटल होतं. हा देश चालवता येणार नाही असं इंग्रज म्हणत असताना टिळक म्हणाले स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे.
advertisement
गुजरातचे आणि लोकमान्य टिळक यांच्या आठवणी सांगताना मोदींनी म्हटलं की, स्वातंत्र्य लढ्यावेळी ते दोन महिने अहमदाबाद साबरमती तुरुंगात होते. १९१६ मध्ये अहमदाबादमध्ये आले. तेव्हा इंग्रंजांकडून जुलूम सुरू असताना. त्यांच्या स्वागतासाठी, ऐकण्यासाठी ४० हजारहून अधिक लोक आले होते. त्या काळात ही संख्या मोठी होती. त्यांना ऐकण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांच्या भाषणात सरदार पटेल यांच्या मनात वेगळा ठसा उमटवला. अहमदाबादमध्ये ते म्युनिसिपालीटीचे प्रेसिडेंट बनले. त्यांनी अहमदाबादमध्ये टिळकांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला.
advertisement
पुतळा व्हिक्टोरिया गार्डनमध्ये उभारला. ब्रिटिश महाराणीच्या नावाने उभा असलेल्या गार्डनमध्ये हा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्यावर दबावही टाकला गेला. पण सरदार पटेल यांनी सांगितलं की पद सोडेन पण पुतळा तिथेच उभारणार. पुतळा १९२९ मध्ये त्याचे लोकार्पण महात्मा गांधींनी केले. अहमदाबादमध्ये मला किती तरी वेळा त्या पवित्र ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. ती एक अद्भुत मूर्ती आहे. असं वाटतं ते स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याकडे ते पाहतायत. गुलामगिरीच्या काळातही त्यांनी इंग्रजांना आव्हान दिलं. आजची अवस्था पाहा, आज परदेशी शासकाचे रस्त्याला असलेलं नाव बदललं तर काहींची झोप उडते असं म्हणत विरोधकांवर टीकाही केली.
मराठी बातम्या/पुणे/
लोकमान्य टिळक पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement