PMC Election : काय म्हणता पुणेकर? कसब्यात पुन्हा धंगेकर? गणेश बिडकरांच्या विरोधात धंगेकरांच्या लेकाने ठोकला शड्डू!

Last Updated:

Pranav dhangekar vs Ganesh bidkar : पुण्यात प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती, कमला नेहरू आणि केएम हॉस्पिटल या प्रभागातून गणेश बिडकर आणि प्रणव धंगेकर आमने सामने आले आहेत.

Pranav dhangekar vs Ganesh bidkar
Pranav dhangekar vs Ganesh bidkar
Kasaba PMC Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत स्पष्टता दिसून आली नाही. त्यामुळे आता पुण्यातील अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेसेना असा मुकाबला पहायला मिळणार आहे. भाजप आणि शिंदे गटातील जागावाटपाची चर्चा अर्जाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सुरूच राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. जागावाटप न झाल्याने अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म वाटते होते. अशातच आता कसब्यात 2017 ची पुनरावृत्ती झाली आहे. पुण्यात पुन्हा भाजप विरुद्ध धंगेकर असा सामना रंगणार आहे.

प्रणव धंगेकर vs गणेश बिडकर

प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बिडकर यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर रिंगणात उतरला आहे. प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती, कमला नेहरू आणि केएम हॉस्पिटल या प्रभागातून गणेश बिडकर आणि प्रणव धंगेकर आमने सामने आले आहेत. पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटल्याने आता धंगेकर आणि बिडकर यांच्यात निवडणूक रंगणार आहे.
advertisement

पुण्यातील सर्वात हायप्रोफाईल सीट

माजी आमदार रविंद्र धंगेकरांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 23 मधुन तर मुलगा प्रणव याने प्रभाग क्रमांक 24 मधुन निवडणूक अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे प्रणव धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर असा सामना पहायला मिळेल. पुण्यातील ही सर्वात हायप्रोफाईल सीट असणार आहे.

कसब्यात कोण बाजी मारणार?

advertisement
विशेष म्हणजे, 2017 मध्ये रवींद्र धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. आता 2017 च्या त्या अटीतटीच्या लढतीची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी गणेश बिडकर यांच्यासमोर रवींद्र धंगेकरांच्या पुत्राने, प्रणव धंगेकराने मोठे आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे आता कसब्यात कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PMC Election : काय म्हणता पुणेकर? कसब्यात पुन्हा धंगेकर? गणेश बिडकरांच्या विरोधात धंगेकरांच्या लेकाने ठोकला शड्डू!
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement