Pune Ring Road: पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅममधून सुटका होणार! रिंगरोडच्या कामाचा 'टॉप गिअर'; मोठी अपडेट समोर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
Pune Ring Road: पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या पश्चिम टप्प्याचे काम आता गती घेत असून आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन वर्षांत म्हणजेच डिसेंबर २०२७ पर्यंत पश्चिम टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
पुणे बाह्य रिंगरोडचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागले गेले आहे. पावसाळा संपल्याने कामाचा वेग वाढवण्यात आला असून, मे महिन्यापर्यंत प्रमुख टप्पे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पश्चिम टप्पा डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे संकेत आहेत. तर, पूर्व टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी मे २०२८ पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
advertisement
नव्या निविदा आणि बदललेले नियोजन: रिंगरोडच्या एकूण लांबीपैकी ३१ किलोमीटरच्या कामासाठी महामंडळाने नव्याने निविदा प्रक्रिया राबवली आहे. यापूर्वी नगर रस्ता ते सोलापूर रस्ता आणि पुढे पुणे-बेंगळुरू हायवेला जोडणाऱ्या या ३१ किमीच्या पट्ट्याचे काम नॅशनल हायवे अथॉरिटी (NHAI) करणार होती. मात्र, आता हे काम पुन्हा 'एमएसआरडीसी'च करणार असल्याचे निश्चित झाले आहे. या ३१ किमीच्या पट्ट्याचे काम लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.
advertisement
पूर्व टप्प्यात 'एनएचएआय'कडून पुणे-संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉरचे काम प्रस्तावित आहे. या प्रस्तावित रस्त्याचा आणि रिंगरोडचा काही भाग एकाच मार्गिकेवरून जात असल्याने नियोजनात काही बदल करण्यात आले होते. मात्र, आता संपूर्ण रिंगरोडचे नियंत्रण महामंडळाकडेच राहून २०२८ पर्यंत संपूर्ण रिंगरोड वाहतुकीसाठी सज्ज करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 10:26 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Ring Road: पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅममधून सुटका होणार! रिंगरोडच्या कामाचा 'टॉप गिअर'; मोठी अपडेट समोर










